शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

घरफाळाप्रश्नी प्रशासनावर हल्लाबोल

By admin | Updated: April 17, 2016 00:55 IST

महानगरपालिका सभा : उप शहर अभियंता माने यांना काढले बाहेर, सदस्य आक्रमक, ‘आयुक्त चले जाव’च्या घोषणांनी सभागृह दणाणले

कोल्हापूर : घरफाळा वाढीचा प्रस्ताव नाकारल्यानंतर तो विखंडित करण्यासाठी राज्य सरकारकडे का पाठविला आणि खासगी आरक्षित जागेतील सन २००० पूर्वीच्या झोपड्या कोणाच्या सांगण्यावरून हटविल्या, या दोन प्रश्नांवर शनिवारी महानगरपालिकेच्या सभेत सदस्यांनी प्रशासनावर टीकेची झोड उठवित हल्लाबोल केला. प्रशासनाच्या कृतीचा निषेध करताना ‘आयुक्त चले जाव’च्या घोषणांनी सभागृह दणाणून गेले. एका अधिकाऱ्याच्या हातातील फाईल सभागृहात भिरकावली, तर एका सदस्याने संबंधित अधिकाऱ्यांच्या दिशेने फाईल भिरकावली. सदस्यांची आक्रमक भूमिका पाहून अधिकाऱ्यांना मात्र अक्षरश: घाम फुटला. महापौर अश्विनी रामाणे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी महानगरपालिकेच्या दोन सभा झाल्या. पहिल्या सभेत सदस्यांनी अक्षरश: ठरवून प्रशासनाला लक्ष्य केले. त्याच्या केंद्रस्थानी आयुक्त पी. शिवशंकर होते. फेबु्रवारी महिन्यात झालेल्या सभेत घरफाळा वाढीचा ठराव नामंजूर केला होता, तरीही महासभेचा नामंजूर केलेला ठराव विखंडित करावा म्हणून तो राज्य सरकारकडे पाठविण्यात आल्यामुळे संपूर्ण सभागृहाने आयुक्तांना टीकेचे लक्ष्य केले. आयुक्तांनी महापौरांसह संपूर्ण सभागृहाचा अवमान केला असून, त्यांच्या बदलीचा ठराव याच सभेत करावा, अशी मागणी संतप्त सदस्यांमधून पुढे आली. विशेष म्हणजे या सभेस आयुक्त उपस्थित नव्हते. घरफाळा वाढीचा ठराव विखंडित करण्याच्या आयुक्तांनी केलेल्या मागणीचा मुद्दा विजय सूर्यवंशी यांनी उपस्थित केला आणि सभागृहात चौफेर टीका करण्यात आली. पहिला शाब्दिक हल्ला अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्यावरच झाला. घरफाळा वाढ रद्द करण्याचा ठराव झाला तर तो राज्य सरकारकडे विखंडित करण्यासाठी पाठविणार नाही, असे आश्वासन मागील सभेत आयुक्तगैरहजर असताना तुम्ही सभागृहाला आश्वासन दिले होते. तरीही तो आयुक्तांनी राज्य सरकारकडे का पाठविण्यात आला, असा जाब संतप्त सदस्यांनी अतिरिक्त आयुक्तांनी विचारण्यास सुरुवात केली. विजय सूर्यवंशी, तौफिक मुल्लाणी, भूपाल शेटे, अजित ठाणेकर, प्रवीण लिमकर, राहुल चव्हाण, कमलाकर भोसले, तर प्रशासनावर तुटून पडले. सभागृहाचा अवमान करणाऱ्या अधिकाऱ्यास आयुक्तांच्या खुर्चीत बसण्याचा अधिकार नाही, त्यांनी कामकाजात भाग घेऊ नये, अशा शब्दांत तोंडसुख घेतले. सभाध्यक्ष महापौर रामाणे यांनीही तुम्ही सांगितले एक आणि केले उलटे, आधी त्याचा खुलासा करा, असा आदेश दिला. (प्रतिनिधी)