शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
5
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
6
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
7
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
8
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
9
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
10
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
11
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
12
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
13
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
14
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
15
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
16
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
17
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
18
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
19
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

प्रवेशाच्या पहिल्या दिवशीच हाऊसफुल्ल--महानगरपालिकेचे जरग विद्यामंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 17:31 IST

महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थिसंख्या रोडावत असल्याने अनेक शाळा बंद पडल्या. येत्या काही वर्षांत शहरात महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळा दिसणार नाहीत इतकी वाईट अवस्था आहे. महापालिकेच्या शाळाच राहिल्या नाहीत तर गोरगरीब समाजातील होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होणार आहे. महानगरपालिकेच्या काही शाळांत मात्र ‘शाळेत पहिल्या दिवशी प्रवेश हाऊसफुल्ल’ असे फलक लागले आहेत. या शाळांचे गुणवत्तेचे वेगळेपण टिपणारी वृत्तमालिका आजपासून.

ठळक मुद्देमराठी माध्यमाची पहिली ई-लर्निंग सुविधा असलेली शाळा बोलक्या भिंती व अभ्यासास पूरक सजावट असलेले वर्ग शाळेच्या भौतिक सुविधांसाठी विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण, खेळ, क्रीडा शिक्षण यांची सुविधा.

प्रदीप शिंदेकोल्हापूर : जरगनगर येथील कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर, शाळा क्र. ७१ या शाळेने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर कोल्हापूर शहरातच नव्हे, तर महाराष्ट्रामध्ये वेगळा ठसा उमटविला आहे. पूर्वमाध्यमिक व माध्यमिक शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत या शाळेतील मुले कायमच अव्वल, हे जणू समीकरणच बनल्याने शाळेच्या प्रवेशाच्या पहिल्या दिवशीच शाळेत हाऊसफुल्लचा फलक लागला आहे.

या शाळेची स्थापना ११ एप्रिल १९९४ रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर झाली. जरगनगर-रामानंदनगर, पाचगाव या परिसरातील मुलांना दर्जेदार, मोफत शिक्षण मिळावे हा एकमेव दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून प्रभागाचे तत्कालीन नगरसेवक नानासो जरग आणि सुपरवायझर विमल गवळी यांनी पुढाकार घेऊन ही शाळा सुरू केली. ४० विद्यार्थ्यांवर ही शाळा सुरू झाली. शाळा टिकविण्यासाठी आणि सामान्य घरांतील मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी येथील शिक्षकांनी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविल्याने प्रत्येक वर्षी विद्यार्थिसंख्येचा आलेख वाढत गेला.

शाळेत आज बालवाडीपासून ते सातवीपर्यंत सेमी माध्यम व मराठी माध्यमाचे वर्ग असून १ हजार ९६० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेमध्ये विविध शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या हेतूने शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, सेवकवर्ग कार्यरत आहेत. यामुळे सामान्य घरातील मुले शिष्यवृत्ती परीक्षेत अव्वल ठरली आहेत. मुलांच्या गुणवत्ता सुधारणांसह सर्वांगीण प्रगती होण्यासाठी आदर्श विद्यार्थी-विद्यार्थिनी पुरस्कार, शालेय क्रीडा महोत्सव, बालसभा, विविध स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, वृक्षदिंडी, माता-पालक प्रबोधन मेळावा, शैक्षणिक सहली, वार्षिक स्नेहसंमेलन, आदी उपक्रम राबविले जातात. शाळेत ४० शिक्षक कार्यरत असून, सर्व शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी जास्तीत जास्त वेळ देऊन जादा तासांचे नियोजन केले जाते, हे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणता येईल.३८ वर्गशाळेमध्ये एकूण ३८ वर्ग आहेत. गतवर्षी बालवाडीमध्ये ३५० विद्यार्थी आणि पहिली ते सातवीपर्यंत १६१० विद्यार्थी असे एकूण १९६० विद्यार्थी शिक्षण घेत होते. शाळेमध्ये मराठी माध्यमाबरोबर सेमी माध्यमाचे वर्गही सुरू करण्यात आले असून, आज शाळेत सेमी माध्यमाच्या आणि मराठी माध्यमाच्या एकूण ३८ तुकड्यांमधून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.शिष्यवृत्तीमध्ये ‘जरगनगर पॅटर्न’शाळेत पूर्वमाध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेची विशेष तयारी करून घेतली जाते. आज कोल्हापूर शहरात शिष्यवृत्तीसंदर्भात जरगनगर विद्यामंदिर पॅटर्न हा वेगळा ठसा निर्माण झाला आहे. सुमारे ५०० हून अधिक विद्यार्थी शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य आणि जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले आहेत. प्रत्येक वर्षी यामध्ये भर पडत असते. विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी सकाळी आठ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत विशेष मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये हा ‘जरगनगर पॅटर्न’ म्हणून ओळखला जातो.पिण्याच्या पाण्याची गरजशाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. त्या मानाने पिण्याच्या पाण्याची अपुरी व्यवस्था आहे. शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. तसेच शाळेसाठी उपलब्ध असलेल्या मैदानाचे सपाटीकरण करून, पटसंख्या पाहता पाच वाढीव वर्ग उपलब्ध होणे तितकेच गरजेचे आहे. 

उपनगरातील सामान्य कुटुंबातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, या उद्देशानाचे ही शाळा सुरू केली. भाड्याच्या खोलीत सुरू झालेल्या शाळेची आज स्वत:ची इमारत आहे. सामान्य घरातील मुले गुणवत्ता यादीत येतात, हे पाहून खूप समाधान आणि तितकाच आनंदही होतो.- नाना जरग, माजी नगरसेवकविद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासह शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी भर देण्यात येत आहे. त्यामुळेच सलग दोन वर्षे महानगरपालिका स्तरीय क्रीडा स्पर्धेत जरग विद्यामंदिरने अव्वल स्थान मिळविले. शाळेतील प्रत्येक कर्मचारी शाळा ही आपल्या कुटुंबातील एक घटक आहे, या भावनेने काम करतो.उत्तम गुरव, मुख्याध्यापकमराठी माध्यमाची पहिली ई-लर्निंग सुविधा असलेली शाळाबोलक्या भिंती व अभ्यासास पूरक सजावट असलेले वर्गशाळेच्या भौतिक सुविधांसाठी अनेकांकडून मदतविद्यार्थ्यांना संगणक शिक्षण, खेळ, क्रीडा शिक्षण यांची सुविधा. 

 

टॅग्स :SchoolशाळाMuncipal Corporationनगर पालिका