शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

घरफाळा वाढीचा चेंडू महासभेकडे

By admin | Updated: February 12, 2016 01:15 IST

स्थायी समिती सभा : चर्चेविना प्रस्ताव टोलवला

कोल्हापूर : शहरवासीयांच्या मानगुटीवर बसणाऱ्या २० ते ४० टक्के घरफाळा वाढीच्या प्रस्तावावर कोणतीही चर्चा न करता तो अंतिम निर्णयासाठी महासभेकडे पाठविण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या महानगरपालिका स्थायी समितीच्या सभेत झाला. स्थायी समितीचे नवीन सभागृह आकारास आल्यानंतर पहिल्याच सभेत घरफाळा वाढीचा हा प्रस्ताव प्रशासनाने ठेवला होता; पण सदस्यांनी या निर्णयाचा चेंडू अखेर महासभेकडे टोलवून नागरिकांच्या रोषातून आपली सुटका करून घेतली. सभेच्या अध्यक्षस्थानी स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव हे होते. कोल्हापुरात भांडवली मूल्यावर आधारित घरफाळा आकारणी (पान १ वरून) लागू करण्याबाबत महापालिकेत दि. ११ मार्च २०११ ला झालेल्या महासभेतील ठरावानुसार निश्चित केलेल्या रेडिरेकनरच्या दरानुसार महापालिका हद्दीतील मिळकतींना सुधारित करआकारणी झालेली आहे. याशिवाय गेल्या पाच वर्षांत रेडिरेकनरच्या दरात प्रत्येक वर्षी वाढ होऊनही सुधारित रेडिरेकनरच्या दराप्रमाणे महानगरपालिका हद्दीतील मालमत्ता कराची आकारणी वाढीव दराने केलेली नाही. त्यातील तरतुदीनुसार आयुक्तांना पाच वर्षांनंतर भांडवली मूल्य सुधारित करण्याचे अधिकार दिलेले आहेत. या नियमामध्ये ४० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ करण्यात येऊ नयेत, असे स्पष्ट संकेत आहेत. शहराच्या काही भागांत अशा सुधारित बाजार मूल्याचा दर हा किमान २० ते ४० टक्क्यांपर्यंतच्या रकमेपर्यंत जास्त वाढल्याचे दिसून येत आहे. सन २०१५-१६ मध्ये या मिळकतींत देय असलेल्या मालमत्ता करात २० ते ४० टक्क्यांपर्यंत वाढ होण्याचे संकेत आहेत. कोल्हापूर शहराचा रेडिरेकनर २३७ विभागांत विखुरला आहे. ए, बी, सी, डी व ई अशा पाच वॉर्डात त्यांची महापालिका प्रशासनाने विभागणी करून नवीन रेडिरेकनर दराप्रमाणे हा घरफाळा वाढीचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला होता. राज्यात सर्वत्र प्रचलित पद्धतीने घरफाळा घेतला जात असताना कोल्हापुरातच फक्त भांडवली मूल्यावर आधारित घरफाळा वसूल केला जात आहे. त्यामुळे मिळकतधारकांच्या घरफाळा बिलात कमालीची वाढ दिसत आहे. स्थायी समिती सभेत या घरफाळा वाढीवर कोणतीही चर्चा न करता शहरातील अनेक मालमत्तांचे अद्याप असेसमेंट राहिले आहे, अशा मालमत्तांचा प्रथम शोध घ्या, अशा सूचना सदस्यांनी मांडल्या. यापूर्वी आलेल्या घरफाळाच्या वाढीव बिलावरुन शहरवासीयांत अगोदरच रोष असल्याने प्रशासनाच्या या नव्या वाढीव घरफाळा वाढीच्या प्रस्तावावर कोणतीही चर्चा न करता निर्णयाचा चेंडू सदस्यांनी थेट महासभेकडे सोपविला. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी या प्रस्तावावर चर्चा करून त्यावर निर्णय घ्यावा, असेही काहींनी मत मांडले. (प्रतिनिधी)--प्रस्तावात घरफाळा वाढीचा उल्लेख नाही महापालिका प्रशासनाने ‘पोट कलम ३’ नुसार भांडवली मूल्य सुधारित करणे व मालमत्ता कराचे दर मागील वर्षाप्रमाणे कायम ठेवण्याबाबत स्थायी समितीमार्फत महासभेची मंजुरी होण्याबाबतचा कार्यालयीन प्रस्ताव ठेवण्यात आला होता; पण प्रस्तावात कुठेही ‘घरफाळा वाढ’ असा उल्लेख नाही पण रेडिरेकनरच्या बदलत्या दरानुसार घरफाळ्याची बिले मोठ्या रकमेची पोहोचणार आहेत. मिळकतींच्या फेरसर्वेक्षणासाठी खासगी एजन्सी नेमणारकोल्हापूर शहरातील मिळकतींचे पाच वर्षांनी करावयाच्या फेरसर्वेक्षणासाठी खासगी एजन्सीची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला या सभेत मंजुरी देण्यात आली.