शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी सेविकांचा तासभर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2017 00:43 IST

रणरणत्या उन्हात मोर्चा : सरकारविरोधी घोषणाबाजी; १ एप्रिलपासून बेमुदत संपावर

कोल्हापूर : मानधनवाढीचा निर्णय सरकारने न घेतल्याने १ एप्रिलपासून संपावर जाण्याचा इशारा सोमवारी रणरणत्या उन्हात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढून दिला. या ठिकाणी राज्य सरकार व महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्या निषेधाच्या घोषणा देत आंदोलकांनी तासभर ठिय्या मारला. दुपारी एकच्या सुमारास महावीर उद्यान येथून कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या माध्यमातून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मोर्चाला सुरुवात झाली. दोन हजारांहून अधिक अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाल्या होत्या. ‘मानधन वाढ झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही’, ‘या सरकारचे करायचे काय?’ अशा घोषणांचे फलक घेतलेल्या आंदोलकांनी जिल्हा परिषदेवर धडक दिली. या ठिकाणी फाटकातून आत प्रवेश करीत थेट जि. प.च्या प्रवेशद्वाराजवळ जाऊन निदर्शने करून ठिय्या मारला. या ठिकाणी राज्य सरकारसह मंत्री पंकजा मुंडे यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. रणरणत्या उन्हात तब्बल तासभर ठिय्या मारण्यात आला. दरम्यान, संघटनेचे जिल्हाध्यक्ष आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांची भेट घेऊन निवेदन सादर करून चर्चा केली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) शिल्पा पाटील उपस्थित होत्या.अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या मागण्यांबाबत यापूर्वी अनेकवेळा आंदोलने झाली आहेत. शासनाने सेविका व मदतनीस यांना मानधनवाढ देण्याबाबत समिती स्थापन केली आहे, परंतु या समितीचे कामकाज संथगतीने सुरू आहे. याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील दहा हजार अंगणवाडी सेविका व मदतनीस १ एप्रिलपासून संपावर जाणार आहेत. याबरोबरच केंद्र सरकारने सेविका व मदतनिसांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे, त्याची अंमलबजावणी केली पाहिजे व यातील फरकाची रक्कम तत्काळ मिळाली पाहिजे, अशा विविध मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.यावर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे चार महिन्यांचे थकीत मानधन या आठवड्यात देऊ, तसेच कर्मचाऱ्यांवर लाईन लिस्टिंगच्या कामाची सक्ती करू देणार नाही, असे आश्वासन डॉ. खेमनार यांनी दिले. आंदोलनात जयश्री पाटील, सरिता कंदले, शोभा भंडारे, विद्या कांबळे, नंदा भोरे, कमल जाधव, मंगल माळी, अपर्णा मिरजकर, सुमन शिरगावे, सुनीता खोत, पद्मावती चौगुले, सुलोचना कोळी, आदी सहभागी झाल्या होत्या. अंगणवाडी सेविकांच्या मागण्याराज्य शासनाने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मानधनवाढ देण्याबाबत स्थापन केलेल्या समितीचे काम संथगतीने केंद्र सरकारने मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे, त्याची अंमलबजावणी केली पाहिजे व फरकाची रक्कम मिळाली पाहिजेअंगणवाडी सेविका व मदतनिसांना किमान वेतन म्हणून महिन्याला १८,००० रुपये मिळावेत, अंगणवाडी मदतनिसांचे मानधन हे सेविकांपेक्षा ५० टक्के कमी आहे ते ७५ टक्के इतके करण्यात यावे.