शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामविकासावर राळेगणसिद्धीत तासभर संवाद, मुश्रीफ यांनी घेतली हजारे यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 15:33 IST

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची शुक्रवारी राळेगणसिद्धी येथे तासभर ग्रामपंचायतीवरील प्रशासक नियुक्तीच्या कायद्यासह लोकसहभागातून ग्रामविकास व समृद्ध खेडी या विषयावर चर्चा झाली. .

ठळक मुद्देहसन मुश्रीफ यांनी घेतली अण्णा हजारे यांची भेट प्रशासक नियुक्तीसह ग्रामविकासावर झाला राळेगणसिद्धीत तासभर संवाद

कोल्हापूर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची शुक्रवारी राळेगणसिद्धी येथे भेट झाली. दुपारी तीन वाजता सुमारे तासभर ग्रामपंचायतीवरील प्रशासक नियुक्तीच्या कायद्यासह लोकसहभागातून ग्रामविकास व समृद्ध खेडी या विषयावर चर्चा झाली. ग्रामविकासावर चर्चा करण्यासाठी उभयतांमध्ये पुन्हा भेटण्याचे निश्चित करण्यात आले.राज्याच्या ग्रामविकास विभागाने आठवडाभरापूर्वी मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीच्या नवीन कायदा आणला. त्यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून खासगी व्यक्तींच्या नियुक्तीबाबत नापसंती व्यक्त केली होती. मंत्री हसन मुश्रीफ यांनीही याबाबत, अण्णा हजारे यांची लवकरच भेट घेऊन सविस्तर चर्चा करू, असे पत्र लिहिले होते.त्यानुसार अहमदनगर दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री मुश्रीफ यांनी राळेगणसिद्धीत अण्णा हजारे यांची भेट घेतली. यावेळी, अण्णा हजारे यांनी महात्मा गांधीजी यांनी सांगितल्याप्रमाणे निसर्ग, जमीन, पर्यावरण या साधनसंपत्तीवरच आपण गावे समृद्ध करू शकतो, असे सांगितले. अण्णा हजारे यांनी मंत्री मुश्रीफ यांना ग्रामविकास, गावाच्या विकासात लोकसहभाग, ग्रामसभेचे अधिकार, समृद्ध गावे या विषयांवरील पुस्तके भेट दिली.अण्णांची नाराजी आणि मुश्रीफांचे स्पष्टीकरणया भेटीत अण्णा हजारे यांनी खासगी व्यक्तीच्या ग्रामपंचायतीवरील प्रशासक नियुक्तीच्या कायद्याबाबत नाराजी व्यक्त केली. दरम्यान, कोरोनासारख्या महामारीच्या परिस्थितीत गावगाडा सुरळीत चालण्यासाठी असाधारण परिस्थितीत हा कायदा करावा लागल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. तसेच उच्च न्यायालयाच्या न्यायालयीन बाबीबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले. 

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेgram panchayatग्राम पंचायतHasan Mushrifहसन मुश्रीफralegaon-acराळेगाव