शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आठनंतर हॉटेल्स बंद... पार्सल सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्य शासनाने रात्री आठनंतर जमावबंदीचे नियम लावल्याने हॉटेल व्यावसायिक पुन्हा अडचणीत आले आहेत. जेवणाची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : राज्य शासनाने रात्री आठनंतर जमावबंदीचे नियम लावल्याने हॉटेल व्यावसायिक पुन्हा अडचणीत आले आहेत. जेवणाची खरी वेळ आठनंतर सुरू होते. पण त्याचवेळी हॉटेल्स-रेस्टॉरंट बंद करावी लागणार असल्याने त्याचा थेट परिणाम व्यवसायावर होणार आहे. कोल्हापुरात अद्याप कोरोनाचा फारसा प्रादुर्भाव नाही किंवा कंटेनमेंट झोन वगळता अन्यत्र ही वेळ वाढवून दहा करण्यात यावी, अशी हॉटेल व्यावसायिकांची मागणी आहे.

कोरोनामुळे गेल्या वर्षापासून सर्वच क्षेत्रांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. आता कुठे जनजीवन पूर्वपदावर येत असताना, गेल्या दहा-बारा दिवसांपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. त्यामुळे राज्य शासनाने कडक निर्बंध घालायला सुरुवात केली असून रात्री आठनंतर जमावबंदी लागू केली आहे. शिवाय हॉटेल्स, रेस्टॉरंट बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या ठिकाणी केवळ पार्सल सेवा किंवा घरपोच सेवा सुरू असेल. दिवसभराच्या कामकाजानंतर लोक रात्रीच जेवणाचा बेत आखतात. ही वेळ कुटुंबियांसोबत, मित्रमंडळींसोबत घालविण्याची असते. पार्सल सेवा असली तरी, प्रत्यक्ष हॉटेलमध्ये बसून जेवणाचा आस्वाद घेण्याचा अनुभव वेगळा असतो. त्यात खवय्या कोल्हापुरात तर रात्री उशिरापर्यंत हॉटेल्स, खानावळी भरलेल्या असतात.

गतवर्षी सगळे व्यवसाय सुरू झाल्यानंतर सर्वात शेवटी जिल्हा प्रशासनाने हॉटेल्स सुरू करण्याची परवानगी दिली. आता पुन्हा आठनंतर बंदमुळे ग्राहकांना हॉटेलमध्ये बसून जेवता येणार नाही. त्याचा परिणाम व्यवसायावर होणार आहे.

---

हॉटेल व्यवसायाची मुख्य उलाढाल रात्री आठनंतरच होते. त्यामुळे प्रशासनाने सरसकट बंदीचा निर्णय घेऊ नये. हॉटेल्स व्यावसायिक पुरेशी दक्षता घेत आहेत. त्या त्या जिल्ह्याची कोरोना स्थिती पाहूनच याबाबतचा निर्णय व्हायला हवा.

- उज्ज्वल नागेशकर

अध्यक्ष,

कोल्हापूर हॉटेल मालक संघ कोल्हापूर

गतवर्षी सर्व उद्योग व्यवसाय सुरू झाल्यानंतर हॉटेल्सना परवानगी देण्यात आली. आता सरसकट आठनंतर हॉटेलमध्ये बसून जेवण्यावर बंदी आहे. पण हीच वेळ जेवण्याची असते. प्रत्येक जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा विचार करून तसेच कंटेनमेंट झोन वगळून रात्री दहा वाजेपर्यंत हॉटेल्स सुरू ठेवण्याची परवानगी मिळावी.

- आनंद माने (हॉटेल व्यावसायिक)

--

दृष्टिक्षेपात हॉटेल व्यवसाय...

जिल्ह्यात हॉटेल्स, रेस्टॉरंट्‌स व बार मिळून एकत्रित संख्या : ३ हजार

प्रतिदिन उलाढाल : ५ कोटी

कोल्हापूर शहरातील छोट्या-मोठ्या हॉटेल्सची संख्या : सुमारे १२००