हॉटेल मालक अरुण सुधाकर शेट्टी (वय ३९ रा. यशवंत कॉलनी) याच्यासह कुणाल धनपाल आवटी (वय ३६ रा. कोल्हापूर), संतोष आण्णासो पाटील (वय ३५ रा. रुई), धनंजय चंद्रशेखर जोशी (वय ४४ रा. कोल्हापूर), आदित्य सूर्यकांत घोरपडे (वय २५ रा. रुई), प्रकाश सुरगोंडा पाटील (वय ३१ रा. झेंडा चौक), सारंग रामकृष्ण गोंदकर (वय ३७ रा. झेंडा चौक), कृष्णा रामा इंगळे (वय २५ रा. शहापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. प्रशासनाने कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. कबनूर ग्रामपंचायत हद्दीतील पॅराडाईज हॉटेल अॅण्ड बारमध्ये नियमांचे उल्लंघन करून हॉटेलमध्ये ग्राहकांना बसवून मद्य व जेवण देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार छापा टाकून ७ जणांना मद्यप्राशन व जेवण करताना ताब्यात घेतले.
कोरोना नियमांचे उल्लंघनप्रकरणी हॉटेलवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:18 IST