जयसिंगपूर : उद्योग क्षेत्राबरोबरच शिक्षण क्षेत्रातील संजय घोडावत यांचे कार्य मोठे आहे. घोडावत यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून तरुणांनी वाटचाल करावी, असा संदेश सिनेअभिनेते अनिल कपूर यांनी दिला.अतिग्रे (ता. हातकणंगले) येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये संजय घोडावत यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात अभिनेते अनिल कपूर बोलत होते. यावेळी अनिल कपूर यांच्यासह मान्यवरांनी घोडावत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. माझ्या करिअरची सुरुवात कोल्हापूरमधून झाली. ‘फूल खिले गुलशन गुलशन’ या चित्रपटाच्या शूटिंगकरिता आपण कोल्हापूरमध्येच होतो. त्यामुळे या मातीला मी विसरू शकत नाही, असे सांगून कपूर यांनी ‘राम-लखन’ चित्रपटातील ‘वन टू का फोर... मेरा नाम हैं लखन’ या गीतावर ताल धरून उपस्थितांना डोलविले. तसेच ‘तेजाब’ चित्रपटातील डॉयलॉग म्हणताच विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला.उद्योगपती संजय घोडावत म्हणाले, परिश्रम, मेहनत व परिवाराचे सहकार्य यामुळेच मी उद्योग व शैक्षणिक क्षेत्रात झेप घेतोय. आजवरच्या सर्व यशामध्ये पत्नीचे मोलाचे योगदान आहे. ‘एसजीआय’च्या प्रगतीसाठी माझे उर्वरित आयुष्य देणार असून, जगातील टॉप २०० विद्यापीठांमध्ये आपल्या विद्यापीठाचे नाव असेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.प्रारंभी डॉ. व्ही. ए. रायकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. श्रेया घोडावत यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर प्रा. सोहन तिवडे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी संस्थेचे सचिव श्रेणिक घोडावत यांनी प्रगतीचा आढावा घेतला. याप्रसंगी संजय घोडावत यांच्या यशस्वी जीवनावर आधारित ‘यशोस्तंभ’ पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे विश्वस्त विनायक भोसले, प्राचार्य विराट गिरी, माजी खासदार निवेदिता माने, नीता घोडावत, दानचंद घोडावत, उद्योगपती विनोद घोडावत, विजयचंद घोडावत, सतीश घोडावत, व्ही. ए. रायकर, एस. एम. इंगळे यांच्यासह ‘एसजीआय’ ग्रुपचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी, प्राध्यापक, विद्यार्थी, पालक, उद्योजक उपस्थित होते. प्रा. एस. एम. डिसोझा यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)‘बडे दिलवाला’अनिल कपूर म्हणाले, घोडावत यांच्यापासून मला शिकायला खूप मिळाले. त्यांचे विचार देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यात मला आनंद होईल, असे सांगून ‘संजयजी जैसा बडे दिलवाला आदमी मैने नही देखा’ असे म्हणताच उपस्थितांमधून टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. घोडावत यांच्यासारखा चांगला मित्र मिळाल्याचे सांगून त्यांचा शंभरावा वाढदिवसही मोठ्या दिमाखात साजरा करू, असा आत्मविश्वास त्यांनी जाता-जाता व्यक्त केला.
घोडावत हे उद्योग व शिक्षणातील ‘स्टार’च
By admin | Updated: February 26, 2015 00:06 IST