शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

सूतगिरण्यांचा वीजप्रश्न सुटण्याची आशा

By admin | Updated: October 12, 2015 00:38 IST

निर्णयाकडे लक्ष : संघटनेला शासन स्तरावर सकारात्मक प्रतिसाद

सांगली : राज्यातील सहकारी सूतगिरण्यांचा विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन स्तरावर सकारात्मक हालचाली सुरू असून, सूतगिरण्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या आशा त्यामुळे उंचावल्या आहेत. प्रश्न सुटला नाही, तर आंदोलनाच्या मुद्द्यावर पदाधिकारी ठाम आहेत. राज्यातील १६० सहकारी सूतगिरण्यांपैकी ५७ सूतगिरण्या सुरू व चांगल्या स्थितीत आहेत. त्यासुद्धा बंद पडण्याची चिन्हे दिसत असल्याने अडचणीत सापडलेल्या या सहकारी संस्थांनी एकत्र येऊन सप्टेंबर महिन्यात आंदोलन केले. त्यानंतर वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांना वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, दिलीपतात्या पाटील यांनी याप्रश्नी निवेदन दिले होते. सूतगिरण्यांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते. सूतगिरण्यांसमोर सर्वात मोठा प्रश्न वीजदराचा आहे. यापूर्वी वीज दरासाठी अनुदान मिळत होते. पाच ते साडेपाच रुपये प्रति युनिट असणारा विजेचा दर आता ७.४० रुपये ते ८.२० रुपये झाला आहे. २५ ते ३० टक्के वाढ झाल्याने सूतगिरण्यांचे कंबरडे मोडले आहे. पूर्वीप्रमाणेच सहकारी सूतगिरण्यांना अनुदान मिळावे, अशी मागणी करण्यात आली होती. ऊर्जा खात्याकडेही सूतगिरण्यांचा प्रश्न चर्चेला गेल्याने वस्त्रोद्योगमंत्री, ऊर्जामंत्र्यांची या प्रश्नावर चर्चा झाल्याने हा प्रश्न लवकरच सुटेल, असा आशावाद काही दिवसांपूर्वी दिलीपतात्या पाटील यांनी व्यक्त केला होता. प्रश्न सुटला नाही, तर आंदोलनाच्या भूमिकेवर सूतगिरण्यांचे पदाधिकारी ठाम आहेत. नवीन वस्त्रोद्योग धोरणाचाही फटका बसत आहे. वास्तविक सूतगिरण्यांच्या कर्जप्रकरणावर १० टक्के व्याजाची सवलत मिळावी किंवा व्याजातील सवलतीचे धोरण शासनाने स्वीकारले पाहिजे. सूतगिरण्या आधुनिकीकरणासाठीही प्रोत्साहनपर योजना शासनाने सुरू करणे आवश्यक आहे. तसे झाल्यास सूतगिरण्यांना आधुनिकीकरणाचा चांगला फायदा होऊ शकतो. भारतीय कापूस निगम लिमिटेड शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करून त्याच्या विक्रीसाठी निविदा प्रसिद्ध करते. हा सर्व कापूस बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून (एमएनसी) खरेदी केला जातो. त्यामुळे दरावर कोणतेही नियंत्रण नाही. सध्या सुताचे दर १५ ते २० रुपयांनी घसरले आहेत. त्यामुळे या दरावरही शासनाचे नियंत्रण हवे. या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शासनस्तरावर आता पाठपुराव्याची गरज आहे. तरीही वीजप्रश्न सुटला, तर सूतगिरण्यांचा सर्वात मोठा प्रश्न मार्गी लागणार असल्याने सूतगिरणी चालकांचे लक्ष ऊर्जा खात्याच्या निर्णयाकडे लागले आहे. (प्रतिनिधी)