शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘हौद’ १५ एप्रिलपूर्वी पाडणार

By admin | Updated: April 7, 2016 00:16 IST

आयुक्त : पर्यायी शिवाजी पुलाच्या अडथळ्याबाबत कृती समितीला आश्वासन

कोल्हापूर : येत्या दहा दिवसांत ‘हेरिटेज कमिटी’शी पत्रव्यवहार करून शिवाजी पूल येथील हौद पाडण्याची कार्यवाही करून १५ एप्रिलपर्यंत ही जागा मोकळी करून देऊ, असे आश्वासन महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी बुधवारी दिले. कोल्हापूर शहर सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीने महापौर अश्विनी रामाणे व आयुक्तांची भेट घेऊन शिवाजी पुलाच्या पर्यायी पुलाचे रखडलेले बांधकाम व हद्दवाढीच्या निर्णयाचे काय झाले याची विचारणा केली. यावेळी ते बोलत होते. कृती समितीच्यावतीने निमंत्रक माजी महापौर आर. के. पोवार म्हणाले, ‘शिवाजी पुलास १२५ वर्षे पूर्ण झाली असून, हा पूल पडल्यास त्यास आयुक्त म्हणून आपणास जबाबदार धरले जाईल. नव्या पुलाचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. अडथळा ठरणारी १२ झाडेही प्रत्येकी दोन हजार रुपये व प्रत्येक झाडापाठीमागे तीन ट्री गार्ड देण्याची अटही मान्य केली आहे. तरीही या नव्या पुलास अडथळा ठरणारा हौद पाडला जात नाही. विशेष म्हणजे हा हौद ‘हेरिटेज’च्या यादीत नाही. यापूर्वीही उमा टॉकीज, पाण्याचा खजिना, लक्ष्मीपुरी येथील हौद पाडले आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याने हा हौद तेथून काढून दुसरीकडे बांधून घ्यावा आणि त्याचा खर्च आपल्या खात्याकडून घ्यावा, असा पत्रव्यवहार महापालिकेकडे केला आहे. त्यामुळे हा हौद तेथून त्वरित काढून घ्या, त्यानंतर आम्ही पुलाचे रखडलेले बांधकाम पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे पाठपुरावा करू.’सहायक नगररचनाकार धनंजय खोत यांनी हा हौद पुरातत्त्व खात्याच्या परवानगीने पाडावा लागेल, असे सांगितले. यादीत नसताना हा हौद का पाडत नाही अशी विचारणा कृती समितीच्या बाबा पार्टे, नामदेव गावडे, दिलीप पोवार, आदींनी केली. आयुक्तांनी हस्तक्षेप करीत प्रथम पुरातत्त्व खात्याशी पत्रव्यवहार करून कार्यवाही करू, परंतु त्यासाठी दहा दिवसांची मुदत द्या, असे कृती समितीला सांगितले. त्यावर समाधान न झाल्याने दहा दिवसांत हौद पाडाच, असा आग्रह समितीने धरला. अखेर आयुक्तांनी दहा दिवसांत याबाबत पत्रव्यवहार करून हौद पाडण्याची कार्यवाही करू, असे आश्वासन दिले. यावेळी महापौर रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला, स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव, उपायुक्त विजय खोराटे, सहायक आयुक्त उमेश रणदिवे, नगरसेवक संभाजी जाधव, शारंगधर देशमुख, नगरसेविका वृषाली कदम, नियाज खान, अशोक जाधव, अ‍ॅड. पंडितराव सडोलीकर, किशोर घाटगे, अशोक भंडारे, संभाजीराव जगदाळे, एस. के. माळी, बाबूराव कदम, पद्माकर कापसे, प्रसाद पाटील, श्रीकांत भोसले, अ‍ॅड. चारूलता चव्हाण, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर आदी उपस्थित होते. हद्दवाढीसाठी सुधारित बजेटमध्ये दोन कोटींची विशेष तरतूदहद्दवाढीची मागणी गेली कित्येक वर्षांची आहे. त्यात ज्या गावांचा समावेश होणार आहे, हे माहीत असूनही प्रशासनाने त्या गावांबाबत २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात विशेष दोन कोटींची तरतूद का केली नाही, असा सवाल कृती समितीने आयुक्त, महापौर, स्थायी समिती सभापती यांना विचारला. यामधील गावे व दोन एम.आय.डी.सी.ंचा समावेश आहे. गावांकरिता प्रत्येकी १० लाख, तर दोन एम.आय.डी.सी.ंना प्रत्येकी २५ लाख द्यावेत. यावर आयुक्तांनी राज्य शासनाचा याबाबत निर्णय झालेला नव्हता; पण उपसूचना घालून सुधारित बजेटमध्ये ही तरतूद केली जाईल, असे आश्वासनही कृती समितीला दिले.