शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वृत्तपत्र विक्रेते नामदेव गडदे यांचा प्रामाणिकपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 11:45 IST

Kolhapurnews, Kolhapurnews शाहूपुरी परिसरात रस्त्यावर सापडलेले एक तोळ्याचे मंगळसूत्र हे वृत्तपत्र विक्रेते नामदेव मकाजी गडदे यांनी घोलप कुटुंबीयांना मंगळवारी (दि. ८) प्रामाणिकपणे परत केले. याबद्दल या कुटुंबीयांनी त्यांचे आभार मानले.

ठळक मुद्देएक तोळ्याचे मंगळसूत्र केले परत घोलप कुटुंबीयांनी मानले आभार

 कोल्हापूर : शाहूपुरी परिसरात रस्त्यावर सापडलेले एक तोळ्याचे मंगळसूत्र हे वृत्तपत्र विक्रेते नामदेव मकाजी गडदे यांनी घोलप कुटुंबीयांना मंगळवारी (दि. ८) प्रामाणिकपणे परत केले. याबद्दल या कुटुंबीयांनी त्यांचे आभार मानले.येथील म्हाडा कॉलनीमध्ये राहणारे ६४ वर्षीय गडदे हे राजारामपुरी डेपोचे वृत्तपत्र विक्रेते आहेत. शाहूपुरी परिसरामध्ये ते वृत्तपत्रांचे वितरण करतात. नेहमीप्रमाणे सोमवारी हे काम करताना शहाजी लॉ कॉलेज ते जिल्हा बँक या रस्त्यावरील एका अपार्टमेंटच्या परिसरात सकाळी आठ वाजता त्यांना रस्त्यावर मंगळसूत्र सापडले.

त्यांनी या परिसरात त्याबाबत विचारणा केली. त्यावर तेथील रिक्षाचालक असणाऱ्या घोलप कुटुंबातील हे मंगळसूत्र असून ते विवाह सोहळ्यातील मुहूर्तमेढ कार्यक्रमाच्या वेळी हरविले असल्याचे गडदे यांना समजले.

त्यांनी मंगळवारी घोलप यांना ते परत दिले. दरम्यान, सकाळी वृत्तपत्रांचे वितरण केल्यानंतर गडदे हे दिवसभर ताराबाई पार्क येथील एका कोल्ड्रिंक्सच्या दुकानात व्यवस्थापक म्हणून काम करतात. गेल्या अडीच वर्षांपासून ते येथे कार्यरत आहेत. यापूर्वी शिवाजी उद्यमनगर, लक्ष्मीपुरी परिसरातील एका दुकानात ते कार्यरत होते. त्या ठिकाणी सापडलेले पाच तोळ्यांचे गंठण, मोबाईल आणि काही ग्राहकांनी गडबडीत बिल अदा करताना दिलेले जादा पैसेही गडदे यांनी प्रामाणिकपणे परत केले आहेत.

कष्ट करून जे मिळते त्यामध्ये मी समाधानी आहे. त्यामुळे अनेक वेळा सापडलेले दागिने, मोबाईल, जादा मिळालेले पैसे ज्या-त्या व्यक्तींना मी परत करतो. त्यातून एक वेगळे समाधान मिळते.- नामदेव गडदे, वृत्तपत्र विक्रेते

टॅग्स :kolhapurकोल्हापूर