शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘घर-वापसी’ मोहीम सुरूच राहणार

By admin | Updated: January 28, 2015 01:01 IST

व्यंकटेश आबदेव : विश्व हिंदू परिषद सुवर्णमहोत्सवी सोहळा

कोल्हापूर : गेल्या अनेक शतकांत हिंदू धर्मियांचे मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मांमध्ये धर्मांतर झाले. अशा धर्मांतरित हिंदूंना परत आणण्याचे काम ‘घर-वापसी’च्या माध्यमातून विश्व हिंदू परिषद करत आहे. ‘घर-वापसी’ आणि धर्मांतर यामध्ये फरक आहे. ‘घर-वापसी’चे काम सुरूच राहणार असून, धर्मांतर बंदी कायद्यासाठी मात्र व्हीएचपी ठाम आहे, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रा. व्यंकटेश आबदेव यांनी केले. विश्व हिंदू परिषदेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त कोल्हापूर शाखेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या विशाल हिंदू संमेलनात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून हिंंदू रणरागिनी साध्वी बालिका सरस्वती उपस्थित होत्या. येथील प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर काल, सोमवारी सायंकाळी हे संमेलन झाले. साध्वी बालिका सरस्वती यांनी मुस्लिमांचे आरक्षण बंद केले पाहिजे. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली ‘व्होट बँके’साठी मुस्लिमांचे सुरू असलेले लांगुनचालन थांबवले पाहिजे, गो हत्या करणाऱ्यांना कडक शिक्षा करावी, ‘लव्ह जिहाद’ रोखावा, भारताच्या फाळणीस महात्मा गांधी जबाबदार असल्यामुळे चलनी नोटावर गांधीजींऐवजी छत्रपती शिवरायांची प्रतिमा छापावी, अशी आक्रमक भूमिका मांडली. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे प्रांतसंघटन मंत्री भाऊराव कुदळे, बजरंग दलाचे नेते शंकर गायकर पू. पू. ईश्वर महास्वामी, संतोष तथा बाळ महाराज, आदींची भाषणे झाली. यावेळी विश्व हिंंदू परिषद कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष कॅ. प्रभाकर सावंत, जिल्हा मंत्री जवाहर छाबडा, सहमंत्री श्रीकांत पोतनीस, न्यूझीलंडचे खासदार महेश बिंद्रा आमदार राजेश क्षीरसागर, बंडा साळोखे, महेश उरसाल, महेश जाधव, अ‍ॅड. पंडित सडोलीकर, आदी उपस्थित होते. साध्वींचा नथुराम बाणा महात्मा गांधीजींनी भारताची फाळणी करून देशाची वाट लावली. देशाला त्यांच्या शांतीच्या मार्गाची नाही, तर क्रांतीची गरज आहे. साबरमती के संत अर्थात गांधीजींनी कोणतीही कमाल-बिमाल केली नाही, असा सरळसरळ नथुराम गोडसे बाणाही साध्वी सरस्वतींनी दाखविला. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यामुळे हिंदुत्ववादी शक्तींची आक्रमकता प्रचंड वाढल्याचे साध्वी सरस्वती, तसेच अन्य कार्यकर्त्यांच्या भाषणांतून दिसून आले.