शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात घरांचा पथदर्शी प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 00:19 IST

कोल्हापूर : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पीपीपी तत्त्वावर गृहप्रकल्प राबविण्यास नागरिकांतून होत असलेला विरोध लक्षात घेता, उपलब्ध जागेवर स्वतंत्र घरे ...

कोल्हापूर : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पीपीपी तत्त्वावर गृहप्रकल्प राबविण्यास नागरिकांतून होत असलेला विरोध लक्षात घेता, उपलब्ध जागेवर स्वतंत्र घरे बांधण्याचा पथदर्शी प्रकल्प तयार करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला असून, तो यशस्वी झाला तरच अन्य ठिकाणी त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सध्या अशा पथदर्शी प्रकल्पाचे आराखडे तयार करण्याचे काम सुरू आहे.देशातील प्रत्येक कुटुंबाला २०२२ सालापर्यंत स्वत:चे हक्काचे घर देण्याचा केंद्र सरकारचा संकल्प आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याने संपूर्ण देशभरात त्याची अंमलबजावणी सुरू आहे. हा गृहप्रकल्प तीन प्रकारांचा आहे. पहिल्या प्रकारात ज्यांची स्वत:ची जागा आहे; परंतु घर बांधण्यास पैसे नाहीत, अशा व्यक्तींना सहा टक्के व्याजदराने दहा लाखांपर्यंत कर्ज देणे व त्यांना अडीच लाखांचे अनुदान, दुसऱ्या प्रकारात ज्यांची जागा नाही त्यांना सदनिका व अडीच लाखांचे अनुदान, तर तिसºया प्रकारात झोपडपट्ट्यांचा विकास करून सदनिका देण्यात येणार आहेत.कोल्हापूर शहरात सुमारे आठ हजारांहून अधिक नागरिकांचे सदनिका व स्वत:च्या जागेत घर बांधण्यासाठीचे कर्ज व अनुदान मिळण्याचे प्रस्ताव महापालिकेकडे सादर केले आहेत; तर महापालिका प्रशासनामार्फत संभाजीनगर कामगार चाळ, बोंद्रेनगर, साळोखे पार्क, कदमवाडी अशा चार ठिकाणी झोपडपट्टी विकास करण्याचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत.झोपडपट्टीच्या ठिकाणी गृहप्रकल्प राबविण्यास नागरिकांचा विरोध होत असून, आम्हाला घरे नकोत असे सांगण्यास सुरुवात झाली आहे. चार झोपडपट्ट्यांचे प्र्रस्ताव ‘म्हाडा’च्या पुणे कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत. त्यांची छाननी व मंजुरीचे काम सुरू असतानाच नागरिकांकडून खो बसत असल्याने महापालिका अधिकारी काहीसे नाराज झालेले आहेत. जर नागरिकांचाच विरोध होणार असेल तर गृहप्रकल्प राबविणे योग्य नाही, असे अधिकाºयांचे मत बनले आहे.झोपडपट्ट्यांचा विकास करताना प्रत्येकाला स्वतंत्र घर पाहिजे आहे. त्यामुळे प्रशासनासमोर एक पर्याय आलेला आहे. सध्या जेथे लोक राहतात त्याच जागेवर त्यांना स्वतंत्र घरे बांधून देण्याचा हा पर्याय आहे. त्याकरिता बोंद्रेनगर येथे एक पथदर्शी प्रकल्प तयार करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.बोंद्रेनगरातील जागेवर एकसारखी ८४ घरे कशी बांधता येतील, याचे आराखडे तयार केले जातआहेत. हा प्रकल्प यशस्वीझाला आणि लोकांचा त्यालापाठिंबा मिळाला तर अन्यठिकाणीही असा प्रकल्प राबविता येईल, असा अधिकाºयांना विश्वास वाटतो.