शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

धमकीपत्राची आंदोलकांकडून होळी

By admin | Updated: July 1, 2017 01:02 IST

धमकीपत्राची आंदोलकांकडून होळी

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ‘पुजारी हटाओ, मंदिर बचाओ,’ ‘अंबामाता की जय’च्या घोषणा देत श्री अंबाबाई मंदिर पुजारी हटाओ आंदोलनातील कार्यकर्त्यांना पाठविण्यात आलेल्या धमकीच्या पत्राची शुक्रवारी छत्रपती शिवाजी चौकात होळी करण्यात आली. तसेच या प्रकरणाला जातीयवादाचा रंग देणाऱ्या पुण्यातील अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पदाधिकाऱ्यांचा निषेध करण्यात आला. अंबाबाईला घागरा-चोली नेसविल्यापासून गेल्या वीस दिवसांपासून कोल्हापुरात ‘अंबाबाई मंदिर पुजारी हटाओ’ आंदोलन सुरू झाले आहे. पालकमंत्र्यांच्या बैठकीत श्रीपूजक अजित ठाणेकर यांना मारहाण झाल्यानंतर प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत त्यांना मंदिर प्रवेश बंदी केली आहे. या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. २८) आंदोलनातील कार्यकर्ते दिलीप पाटील यांना दिलीप देसाई, सचिन तोडकर यांच्यासह तुम्हीही अंबाबाई मंदिर आंदोलनातून बाजूला व्हा; अन्यथा पानसरेंप्रमाणे बंदोबस्त करू, अशा आशयाचे पत्र पाठविले आहे. दुसरीकडे, पुण्यातील अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने सोशल मीडियावर व्हीडिओ पाठवून या प्रकरणाला ब्राह्मणविरोधी जातीयवादाचा रंग दिला आहे. या दोन्ही घटनांचा यावेळी निषेध करण्यात आला व धमकीच्या पत्राची होळी करण्यात आली. यावेळी दिलीप देसाई म्हणाले, समन्वय बैठकीत पालकमंत्र्यांनी ‘पुजारी हटाओ’संदर्भात समिती स्थापन करा, असे आदेश दिले आणि आठवड्याभरातच घूमजाव केले. त्यामुळे भाजप सरकारकडून या प्रकरणात न्याय मिळेल, अशी अपेक्षा नाही. न्यायव्यवस्था ही सर्वश्रेष्ठ असते. आंदोलनातून सर्वांचे लक्ष विचलित करून मूळ मुद्दा बाजूला सारण्यासाठी धमकीचे पत्र पाठविण्यात आले आहे, त्याकडे आम्ही दुर्लक्षच केले आहे. ‘पुजारी हटाओ’चा निर्णय होईपर्यंत आंदोलन थांबणार नाही. वसंतराव मुळीक म्हणाले, अवघे कोल्हापूर आता पुजाऱ्यांच्या मनमानीविरोधात बोलू लागले आहे. मूळ मागणीला बगल देण्यासाठी त्याला जातीचा लढा दाखविला जात आहे. आम्ही सुरुवातीपासूनच सांगत आलो आहोत, हा लढा जातीविरोधात नाही तर पुजाऱ्यांच्या प्रवृत्तीविरोधात आहे. यावेळी आर. के. पोवार, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, दिलीप पाटील, किशोर घाटगे, संजय पवार, जिजाऊ ब्रिगेडच्या जयश्री चव्हाण, अ‍ॅड. चारूशीला चव्हाण, माजी नगरसेवक आदिल फरास, प्रकाश पाटील-सरुडकर यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जगताप यांना भोवळ या आंदोलनासाठी उपस्थित असलेले लाला जगताप यांना अचानक चक्कर येऊन ते खाली पडले. आंदोलकांनी त्यांना तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल केले.पुजाऱ्यांना प्रतिगामी शक्तींचे पाठबळडॉ. सुभाष देसाई म्हणाले, वर्षभरापूर्वी मला या पुजाऱ्यांच्या वतीने जिवे मारण्याची धमकी दिली. तेव्हापासून पोलिसांनी एकाही पुजाऱ्याला अटक केलेली नाही. आता पुन्हा तीन आंदोलकांना धमकीचे पत्र आले आहे. यावरून पुजाऱ्यांना प्रतिगामी शक्तींचे पाठबळ असल्याचे सिद्ध होते. वास्तविक गुन्हे दाखल असलेला पुजारी अजित ठाणेकर याला तातडीने अटक करून त्याची संपत्ती जप्त केली पाहिजे. पुजाऱ्यांवर आयकर खात्याने छापे टाकले पाहिजेत.