शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले...
2
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
3
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
4
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
5
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
6
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
7
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
8
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
9
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
10
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
11
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
12
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
13
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
14
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
15
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
16
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
17
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
18
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
19
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
20
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन

अबकारी कर नोटिसीची होळी

By admin | Updated: March 25, 2016 00:53 IST

सराफांचे आंदोलन : लोकसभेत आवाज उठविणार - धनंजय महाडिक

कोल्हापूर : सराफ व्यावसायिकांच्या वतीने गुजरी कॉर्नर येथे अबकारी कराच्या नोटिसीची होळी करण्यात आली. सराफ व्यावसायिकांनी केंद्र शासनाच्या नावे शंखध्वनी केला. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी भेट देत अबकारी करप्रश्नी लोकसभेत आवाज उठविणार असल्याचे आश्वासन सराफ व्यावसायिकांना दिले. गेल्या २३ दिवसांपासून सराफ व्यावसायिकांचे बंद आंदोलन सुरू आहे.खासदार महाडिक म्हणाले, ‘अच्छे दिन’वाल्या सरकारने एकतर्फी निर्णय आपल्यावर लादला आहे. याला वेगळ्या पद्धतीने दबावगट निर्माण करावा लागेल. पुढील महिन्यात होणाऱ्या लोकसभा अधिवेशनामध्ये तर या प्रश्नावर आवाज उठविणार आहेच; त्याशिवाय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याबरोबर बैठक घेऊन आंदोलनाची दाहकता त्यांना पटवून देऊ, असे ते म्हणाले. सराफ व्यावसायिकांच्या वतीने महाडिक यांना निवेदन दिले. सुरेश गायकवाड यांनी स्वागत केले. भरत ओसवाल यांनी आंदोलनाची माहिती दिली. कुलदीप गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. माणिक जैन, राजेश राठोड, नगरसेवक ईश्वर परमार, किरण नकाते, सुरेश ओसवाल, संपत पाटील, बाबा महाडिक, सुहास जाधव, धर्मपाल जिरगे, जितेंद्रकुमार राठोड, किशोर परमार, बाबूराव जाधव यांच्यासह गांधीनगर येथील अशोक रूपाणी, रतन साधवानी, सुदर्शन साधवानी, किरण माणगावकर आणि श्री. पोतदार, आदी उपस्थित होते. यावेळी अबकारी कराच्या नोटिसीची होळी करून शंखध्वनी करण्यात आला. याअगोदर सराफ संघाच्या इमारतीत व्यावसायिकांची बैठक झाली. त्यामध्ये वरिष्ठ स्तरावरून जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत बंद आंदोलन मागे घेणार नसल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर सराफ बाजारातून शंखध्वनी करीत फेरी काढली. (प्रतिनिधी)उद्या मानवी साखळीकोल्हापूर सराफ व्यापारी संघ आणि जिल्हा संघातर्फे उद्या, शनिवारी दुपारी चार वाजता मानवी साखळीचे आयोजन केले आहे. गुजरी कॉर्नर येथे सुरू होणाऱ्या या मानवी साखळीत सर्व सराफ व्यावसायिक, कर्मचारी सहभागी होणार आहेत. यामध्ये जिल्ह्णाबरोबर सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि बेळगाव जिल्ह्णांतील सराफ बंधू उपस्थित राहणार आहेत.