शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लजला केंद्रीय प्रवेश स्थगिती आदेशाची होळी

By admin | Updated: June 10, 2017 00:50 IST

तत्काळ नव्याने मान्यता : विविध संघटनांचा साखर वाटून आनंदोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कगडहिंग्लज : गडहिंग्लज शहरातील अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्यासाठी अचानक काढण्यात आलेल्या आदेशाची विविध पक्ष-संघटनांच्या कार्यकर्त्यांनी येथील प्रांतकचेरीसमोर होळी केली. स्थगिती करण्यात आलेली ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचे लेखी आदेश मिळाल्यानंतर साखर वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.यावर्षीपासून केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय महिन्यापूर्वीच येथील संस्थाचालक, प्राचार्य, पदाधिकारी व अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला होता. शासनाकडून मान्यता मिळाल्यानंतर ही प्रक्रिया राबविण्याचा हालचाली सुरू झाल्या होत्या. दरम्यान, त्यास ‘स्थगिती’चा आदेश देण्यात आला. त्यामुळे येथील पक्ष-संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे सभापती प्रा. जयश्री तेली व भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आमदार हाळवणकर यांच्यामार्फत शिक्षणमंत्र्यांशी संपर्क साधून ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची विनंती केली. त्यानुसार प्रक्रियेस पुन्हा मान्यता देण्यात आली. मात्र, लेखी आदेशाच्या मागणीवर संघटना ठाम राहिल्या.विद्यार्थी, पालकांची मागणी आणि सर्वांच्या संमतीने सुरू झालेल्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत अडथळा आणणारे आणि स्थगिती देणाऱ्यांच्या निषेधार्थ विविध संघटनांनी शुक्रवारी सकाळी येथील प्रांतकचेरीसमोर धरणे आंदोलन करून स्थगिती आदेशाची होळीदेखील केली. दरम्यान, या प्रवेश प्रक्रियेस वरिष्ठ कार्यालयाकडून पुन्हा मान्यता मिळाल्याचा लेखी आदेश येथील शिक्षण विभागातर्फे आंदोलनस्थळी पोहोचविण्यात आला.यावेळी जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक म्हणाले, गडहिंग्लज विभागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी सुरू झालेल्या अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्यांची नावे जनतेच्या माहितीसाठी जाहीर केली पाहिजेत. ही प्रक्रिया पारदर्शकपणे न राबविल्यास पुन्हा आंदोलन छेडले जाईल.युवक काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष व पं. स. सदस्य विद्याधर गुरबे म्हणाले, केंद्रीय प्रवेशासाठी एकत्र आलेल्या सर्व संघटनांच्या एकजुटीचा हा विजय आहे. यापुढेही शैक्षणिक विषयांसह सर्व सामाजिक प्रश्नांसाठी एकजुटीने लढा देण्याची गरज आहे.यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, शिवसेना तालुकाध्यक्ष दिलीप माने यांचीही भाषणे झाली.आंदोलनात माजी जि.प. सदस्य शिवप्रसाद तेली, पं. स. सदस्य इराप्पा हसुरी, अ‍ॅड. दशरथ दळवी, अजित बंदी, प्रशांत देसाई, अवधूत पाटील, प्रतीक क्षीरसागर, आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.