शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
3
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
4
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
5
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
6
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
7
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
8
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
9
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
10
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
11
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
12
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
13
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
14
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
15
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
16
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
17
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
18
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
19
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
20
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरचा कुस्ती इतिहासही अधोरेखित व्हावा

By admin | Updated: June 9, 2017 01:18 IST

हिंदकेसरी दीनानाथसिंह; महावीर फोगाट यांच्यावर आधारित ‘आखाडा’ पुस्तक प्रकाशन

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : दुसऱ्याच्या इतिहासावर किती दिवस टाळ्या वाजवायच्या? आता कोल्हापूरच्या कुस्तीचा इतिहासही अधोरेखित होऊ द्या. आपल्याकडेही कुस्तीतील दिग्गज रत्ने आहेत, असे प्रतिपादन हिंदकेसरी दीनानाथसिंह यांनी गुरुवारी केले. शाहू स्मारक भवन येथे महावीरसिंग फोगाट यांच्या संघर्षमय सत्यकथेवर आधारित ‘आखाडा’ पुस्तकाच्या मराठी अनुवादित आवृत्तीच्या प्रकाशनप्रसंगी ‘लेकींना उतरू द्या आखाड्यात’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी हिंदकेसरी गणपतराव आंदळकर होते. दीनानाथसिंह म्हणाले, काही वर्षांपूर्वी सातारा येथे कौशल्या वाघ नावाच्या मुलीने मुलांबरोबर कुस्ती करण्याचा आग्रह धरला. त्यात मी स्वत: व हिंदकेसरी गणपतराव आंदळकर, हिंदकेसरी मारुती माने उपस्थित होतो. त्यात गणपतरावांनी त्या मुलीला तुला जोड नाही म्हणून हटकले. त्यानंतर कौशल्या आपल्या म्हणण्यावर ठाम राहिली. अखेरीस आम्हाला तिच्याबरोबर एक युवा मल्ल खेळवावा लागला. तिने घुटना डावावर त्या पुरुष मल्लालाच चितपट केले. ‘दंगल’मधून अमीरखानने फोगाट परिवाराचा संघर्ष अधोरेखित केला. असाच मिल्खासिंग यांचाही इतिहास ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटातून समोर आला. त्याप्रमाणे आपल्या कोल्हापूरच्या लाल मातीतील इतिहास अधोरेखित व्हावा.पुस्तकाच्या अनुवादिका लीना सोहोनी म्हणाल्या, ‘दंगल’मध्ये फोगाट यांचा संघर्षमय जीवनपट लेखक सौरभ दुग्गल यांनी मांडला आहे. लेखक सौरभ दुग्गल म्हणाले, मला वाटायचे, २००६ साली मास्टर चंदगीराम यांनी कुस्तीपटूने आयुष्यात एकदा तरी कोल्हापूरला भेट द्यावी अन्यथा त्या कुस्तीपटूचे जीवन निरर्थक आहे, असे भेटीदरम्यान सुनावले होते. २००९ साली गीता, बबिता आशियाई व पुढे लंडन आॅलिम्पिकमध्ये भेटल्या. त्यांचा इतिहास ‘आखाडा’रूपाने शब्दबद्ध केला. ’मेहता’चे सुनील मेहता यांनी स्वागत व प्रास्ताविक, तर स्नेहा दुर्गुळे-इनामदार यांनी सूत्रसंचालन केले. हिंदकेसरींना पद्मश्री द्या!फोगाट यांच्यासारखे काम कोल्हापूरच्या कुस्तीतही झाले आहे. त्या कुस्तीरत्नांपैकी शाहूनगरीचे पुत्र हिंदकेसरी गणपतराव आंदळकर व सांगलीचे स्वर्गीय हिंदकेसरी मारुती माने यांना केंद्र सरकारने ‘पद्मश्री’ पुरस्कार द्यावा. आम्ही पैलवान गडी असल्याने उपोषणास बसू शकत नाही; तरी शासनाने याची दखल घ्यावी, असे आवाहनही दीनानाथसिंह यांनी केले. पुस्तक प्रकाशनप्रसंगी कोल्हापुरातील महिला कुस्तीगीर अंकिता शिंदे, सृष्टी भोसले, वैष्णवी कुशाप्पा यांचा सत्कार हिंदकेसरी दीनानाथसिंह व हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांच्या हस्ते झाला.