शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

‘बहुजनपर्व’ उलगडणार नव्वद वर्र्षांचा इतिहास

By admin | Updated: November 28, 2014 00:04 IST

ग्रंथ प्रकाशन बुधवारी : प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्या समग्र माहितीचा समावेश

कोल्हापूर : जातिभेदाची भिंत तोडल्याशिवाय बहुजन समाजाची प्रगती होणार नाही. मागासलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची प्रथम राहण्याची व जेवणाची व्यवस्था केल्याशिवाय अशा मुलांना शिक्षण मिळणार नाही; म्हणून शाहू महाराजांनी संस्थानकाळात २३ वसतिगृहे सर्व जातिधर्मांच्या मुलांसाठी सुरू केली. त्यांपैकी प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचा नव्वद वर्षांचा इतिहास ‘बहुजनपर्व’ या ग्रंथरूपाने बुधवारी (दि. ३ डिसेंबर) सर्वांसमोर उलगडणार आहे. या ग्रंथात नव्वद वर्षांतील संस्थेमधील शिकून गेलेल्या थोर व्यक्ती, अध्यक्ष, ज्यांनी संस्था उभारण्यासाठी मदत केली, त्यांच्याबद्दलची सम्रग माहिती जगासमोर पुस्तकरूपाने मांडली जाणार आहे. १५ जुलै १९२० साली शाहू महाराज यांनी द्वितीय सुपुत्र प्रिन्स शिवाजी यांच्या स्मरणार्थ प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसची स्थापना केली. आजपर्यंत या संस्थेमध्ये लाखो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन आपली व देशाची प्रगती केली. संस्थेच्या प्रगतीचा वेग आणि इतिहास आजच्या पिढीसमोर पुस्तकरूपाने यावा, यासाठी अध्यक्ष डी. बी. पाटील यांच्या पुढाकाराने ७५० पानांचा हा सम्रग ग्रंथ तयार केला आहे. यामध्ये त्याकाळी मदत केलेल्या बाबूराव सासने, टी. वाय. भोईटे, सुबराव निकम, हौसाबाई जाधव, अण्णासाहेब मोरे यांच्याबरोबर प्राचार्य पी. बी. पाटील, पद्मभूषण क्रांतिवीर नागनाथ नायकवडी, साहित्यिक आनंद यादव, हुतात्मा नारायण वारके, माजी कुलगुरू रामचंद्र कणबरकर, कॉम्रेड दत्ता देशमुख, गोविंदराव पानसरे, ज्येष्ठ इतिहासकार जयसिंगराव पवार, डॉ. बी. एम. हिर्डेकर, आदींनी या संस्थेतून शिक्षण घेतले आहे. अशा एक ना अनेक दिग्गजांच्या कार्याचा आढावा या ग्रंथातून घेतला आहे. बुधवारी (दि. ३) संस्थेचे माजी विद्यार्थी व रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. रावसाहेब शिंदे यांच्या हस्ते व श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली या ग्रंथरूपी इतिहासाचे उद्घाटन होणार आहे. ज्येष्ठ इतिहासकार जयसिंगराव पवार यांनी ग्रंथासाठी प्रस्तावना, ए. जी. वणिरे यांनी लेखन आणि प्रा. सी. एम. गायकवाड यांनी संपादन केले आहे. (प्रतिनिधी)वार लावून जेवण्याचा उल्लेखत्याकाळी बहुजन समाजातील मुलांना शिकण्यासाठी कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालय होते. मात्र, या कॉलेजमध्ये केवळ शिक्षण घेता येत होते. राहण्यासाठी या प्रिन्स शिवाजी बोर्डिंगचाच आधार त्याकाळी मुलांना असे. अशा काळात या विद्यार्थ्यांना वार लावून जेवण्यासाठी ३२३ जणांनी मदत केली. त्यांच्याही नावांचा व कार्याचा उल्लेख या ग्रंथात आहे. कोल्हापूर ही वसतिगृहांची मातानाशिक येथे शाहू महाराज एका कार्यक्रमानिमित्त गेले असता भाषणात त्यांनी ‘कोल्हापूर ही वसतिगृहांची माता’ असल्याचा उल्लेख केला. त्यांच्याच दातृत्वामुळे कोल्हापुरात २३ वसतिगृहांची निर्मिती झाली. त्यापैकी प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग एक आहे.