शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

इतिहासाच्या मार्केटिंगची गरज

By admin | Updated: December 31, 2014 00:10 IST

मालोजीराजे : ‘आपलं कोल्हापूर’ दिनदर्शिकेचे प्रकाशन

कोल्हापूर : महाराष्ट्राला आणि कोल्हापूरला फार मोठा इतिहास लाभला आहे. तो फक्त ग्रंथांपुरता आणि अभ्यासकांपुरता मर्यादित न राहता तरुणाईच्या मनांपर्यंत झिरपला पाहिजे, त्यासाठी इतिहासाचे मार्के टिंग करण्याची गरज आहे. त्याचे एक उत्तम माध्यम म्हणून चित्रमय रूपातील ‘आपलं कोल्हापूर’ दिनदर्शिका काम करील, असे मत श्रीमंत मालोजीराजे यांनी व्यक्त केले. परमाळे ग्रुप व ब्रॅँड शेफच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘आपलं कोल्हापूर’ या दिनदर्शिकेच्या प्रकाशन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. हॉटेल के ट्रीमध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार होते. यावेळी पन्हाळ्याचे नगराध्यक्ष असिफ मोकाशी, अनिल परमाळे उपस्थित होते. मालोजीराजे म्हणाले, इतिहास सांगण्यासाठी फक्त ग्रंथ हेच एकमेव माध्यम नाही. चित्रमय पुस्तके, छोटी पुस्तिका, चित्रे अशा अनेक माध्यमांतून तो सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला जाऊ शकतो. आता इतिहासाचे मार्केटिंग करण्याची गरज आहे. डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, तरुणाईला इतिहासाबद्दल अनास्था आहे, हा आरोपच मला चुकीचा वाटतो. शौर्याची गाथा सांगणाऱ्या गडकोटांच्या संवर्धनासाठी तरुणाई पुढाकार घेत आहे. किल्ल्यांची स्वच्छता केली जात आहे. गडकोटांसह सर्व ऐतिहासिक वास्तू आपला इतिहास सांगत असतातच. त्यांकडे फक्त पर्यटनस्थळ म्हणून न पाहता वास्तूंचे महत्त्व जाणून घेतले पाहिजे. यावेळी असिफ मोकाशी यांनी मनोगत व्यक्त केले. अनिल परमाळे यांनी स्वागत केले. सचिन मोरे यांनी सूत्रसंचालन केले. रेखा परमाळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)