शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
4
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
5
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
6
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
7
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
8
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
9
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
10
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
11
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
12
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
13
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
14
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
15
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
16
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाही तर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
17
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
18
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
19
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
20
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...

लढाऊ स्त्रियांंचीच इतिहासात नोंद

By admin | Updated: January 16, 2017 00:47 IST

पुष्पा भावे : जयसिंगराव पवार अमृतमहोत्सव समितीतर्फे एकदिवसीय राष्ट्रीय परिसंवाद

कोल्हापूर : युद्ध, सत्तास्पर्धेमुळे स्त्रीवादी विचार बाजूला पडले. यात राजवंशाच्या व तलवार घेतलेल्या ‘स्त्रिया’च पडद्यावर आल्या. त्यात समाज घडविणाऱ्या व राबणाऱ्या अन्य समाजांतील लढवय्या स्त्रियांना सन्मान मिळाला नाही, असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. पुष्पा भावे यांनी व्यक्त केले. इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार अमृतमहोत्सव समितीतर्फे शाहू स्मारक भवन येथे रविवारी ‘भारतीय इतिहासातील स्त्रीअवकाशाचा शोध’ या विषयावर आयोजित एकदिवसीय राष्ट्रीय परिसंवादाच्या बीजभाषणप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी त्यांच्या हस्ते वसुधा पवार लिखित ‘डॉ. कृष्णाबाई केळवकर : जीवन व कार्य’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. भावे म्हणाल्या, इतिहासलेखनाच्या अनेक पद्धती, शास्त्रे आहेत. तत्कालीन परिस्थितीत विशिष्ट वर्गाने इतिहासाला प्रश्न विचारल्यानेच तळागाळातील माणसे, स्त्रियांच्या इतिहासाबद्दलचा नवा विचार सुरू झाला. आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशांत मौखिक इतिहासाच्या प्रथम कल्पना मांडल्या गेल्या. इतिहासातील पुरावे देताना ताम्रपट, कागदपत्रे पुरेसे ठरत नाहीत. आजच इतिहास समुदायाने सांगितल्याप्रमाणे दिसतो. इतिहासाचे वाचन करताना स्थिर व लवचिक इतिहासाचे अंत:स्तर लक्षात घेतले पाहिजेत. त्या पुढे म्हणाल्या, स्त्रीवाद हा झोपडीपासून महालापर्यंत पसरलेला आहे. ब्राह्मणशाहीने दलित, भटक्या स्त्रियांचे वेगळे नीतिनियम तयार केले. १९ व्या शतकात स्त्रीस्वातंत्र्य चळवळीबद्दल चर्चा झाली. १९७५ नंतर खऱ्या अर्थाने स्त्रीवादी चळवळी जास्त जोमाने पुढे आल्या. इतिहासात आतापर्यंत पुरुषप्रधान संस्कृतीला प्राधान्य दिले गेले आहे. त्यातून स्त्रियांना वगळलेले दिसले. खऱ्या लढवय्या स्त्रियांना यात स्थान दिल्याची नोंद नाही. यावेळी त्यांनी महाभारत, रामायण, आदींचे दाखले दिले. महिला निवडणुकीत विजयी झाल्यानंतर फेटा बांधतात. फेटा हे पुरुष सरंजामशाहीचे प्रतीक आहे. मात्र, फेटा बांधूनही स्त्रियांच्या हाती सत्ता किती असते, हा प्रश्नच आहे. आजही स्त्रियांकडे पाहण्याचा निरोगी दृष्टिकोन नाही. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्र्यसंग्रामासाठी ‘आझाद हिंद फौज’ उभारली. यात त्यांना देशाबाहेरील अडाणी स्त्रियांनी मदत केली; पण त्याची दखल इतिहासात घेतली गेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. महापौर हसिना फरास म्हणाल्या, कोल्हापूरचे नाव जगभर असून विविध क्षेत्रांत ते अग्रभागी राहिले आहे. शाहू महाराजांच्या दूरदृष्टीमुळे माझ्यासारखी अल्पसंख्याक समाजातील स्त्री महापौर बनू शकली. डॉ. जयसिंगराव पवार यांचे इतिहासलेखन मराठ्यांच्या इतिहासापासून ते आधुनिक भारतापर्यंत विस्तारले आहे. तनुजा शिपूरकर यांनी स्वागत केले. आसावरी शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी डॉ. टी. एस. पाटील, डॉ. मेघा पानसरे, डॉ. अवनीश पाटील, तनुजा शिपूरकर, डॉ. अविनाश बागल, राजेश केळवकर, निहाल शिपूरकर, डॉ. मंजूश्री पवार, अरुंधती पवार, सुरेश पवार, व्यंकाप्पा भोसले, आदी मान्यवर उपस्थित होते.