मुरगूड शहराच्या पूर्वेकडील बाजूस यमगे, शिंदेवाडी गावच्या हद्दीमध्ये साधारणत: १९२० च्या सुमारास सर पिराजीराव तलाव बांधला गेला. यामध्ये प्रामुख्याने या तिन्ही गावच्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी या तलावाचा उपयोग व्हावा, या नियोजनातूनच तलावाची मुहूर्तमेढ रोवली होती; पण पिण्यासाठी पाणी देऊन हे शिल्लक राहिलेले पाणी शेतीसाठी दिले जाते. सध्या हा तलाव सर पिराजीराव ट्रस्टच्या म्हणजेच शाहू कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या अधिपत्याखाली आहे. तलावाच्या स्थापनेपासून आजपर्यंत या तिन्ही गावांना अव्याहतपणे पिण्यासाठी पाणी पुरवले जाते. मुरगूड शहरास सध्या पिण्याच्या पाण्याची जास्त आवश्यकता लागत आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाबरोबर शहरातील नागरिकसुद्धा हा तलाव भरण्याची आतुरतेने वाट पाहात होते.
फोटो ओळ
मुरगूड (ता. कागल) येथील ऐतिहासिक सर पिराजीराव तलाव पूर्ण क्षमतेने भरला. मुरगूड-गडहिंग्लज रस्त्यावरील सांडव्यावरून असे पाणी बाहेर पडत आहे.