कोल्हापूर : भाडेवाढ होणार म्हणून गेले महिनाभर गाजत असलेल्या केएमटी बस भाडेवाढीची अंमलबजावणी उद्या, रविवारपासून होत आहे. डिझेलच्या वाढत्या दरांमुळे ‘केएमटी’चा प्रवास दोन रुपयांनी महागणार आहे.केएमटी उपक्रमाच्या सुधारित प्रवासी भाडे दरपत्रकास प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची मान्यता यापूर्वीच मिळाली होती. आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या मान्यतेने रविवारपासून त्याची अंमलबजावणी होत आहे.ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या वार्षिक ओळखपत्राचा आकार २५ रुपयांवरून ५० रुपये करण्यात आला आहे. तसेच पाससाठी आवश्यक असलेल्या ‘आरएफआयडी’ कार्डचा दर ४५ रुपयांवरून ६० रुपये केला आहे.टप्पा क्रमांक जुना दर नवीन दर१ ७.०० ८.००२ ८.०० ८.००३ १०.०० १०.००४ ११.०० १२.००५ १२.०० १४.००६ १४.०० १६.००७ १६.०० १८.००८ १८.०० २०.००९ १९.०० २२.००सवलतीचे पास दरएकदिवसीय पास - ३५ रुपयेएकदिवसीय पास (अर्ध आकार) - २० रु.साप्ताहिक पास - २०० रुपयेपाक्षिक पास - ४०० रुपयेमासिक पास - ७४० रुपयेत्रैमासिक पास - २०५०आठवी ते दहावी विद्यार्थी - ३५० रुपये
‘केएमटी’ची भाडेवाढ उद्यापासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 00:14 IST