शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात अतिवृष्टीने दैना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:58 IST

कोल्हापूर : विजांच्या कडकडाटासह बुधवारी मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे कोल्हापूर शहर आणि परिसरात एकच हाहाकार उडाला.

ठळक मुद्दे उपनगरांत हाहाकार : ५०० हून अधिक घरांत पाणी; अनेक वाहने वाहून गेली

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : विजांच्या कडकडाटासह बुधवारी मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे कोल्हापूर शहर आणि परिसरात एकच हाहाकार उडाला. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी वाहने वाहून गेली. पाचशेहून अधिक घरांत पाणी शिरल्याने प्रापंचिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. तीन ठिकाणी तर रस्ते खचले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. जोरात कोसळणारा पाऊस, घरांत शिरलेले पाणी, खंडित झालेला वीजपुरवठा यामुळे सर्वत्र घबराट पसरली. त्यामुळे बुधवारची रात्र कोल्हापूरकरांनी जागून काढली.

अतिवृष्टीमुळे शहरातील जयंती नाला, गोमती नाला तसेच छोट्या-छोट्या ओढ्यांना लागून असलेल्या घरांना, त्याचबरोबर शहरातील सखल भागातील घरांना सर्वाधिक फटका बसला आहे. पावसाला बुधवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास सुरुवात झाली. सुमारे दोन तास अखंड पाऊस पडत होता. पाऊस इतका प्रचंड होता की, अवघ्या काही मिनिटांत शहरातील ओढे, नाले, गटारी ओसंडून वाहायला लागले. शहरातील जयंती नाला, गोमती नाला, शाम हौसिंग सोसायटी नाल्यासह अन्य छोट्या-छोट्या बारा नाल्यांनी आपली मर्यादा सोडली आणि घरांत पाणी शिरायला सुरुवात झाली. शहरात अनेक घरांतून तीन ते चार फुटांपर्यंत पाणी शिरले. शौचालयाच्या टाक्यांत पाणी शिरल्याने त्यांतील घाण घरात पसरली. जोराचा पाऊस आणि घरात पाणी आल्यामुळे लोकांची भीतीने गाळण उडाली.दोन तासांत तब्बल ७३ मिलिमीटर पाऊस !शहर परिसरात बुधवारी मध्यरात्री बारा ते दोन या दोन तासांत चक्क ७३ मिलिमीटर पाऊस झाल्याचे आपत्ती व्यवस्थापन कक्षातून सांगण्यात आले. करवीर मंडल हद्दीत ७३ मिलिमीटर, कसबा बावडा मंडल हद्दीत ७३, तर निगवे दुमाला हद्दीत ८२ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे. या आकडेवारीवरून पावसाने शहर परिसरात किती धुमाकूळ घातला, हे दिसून येते. सर्वसाधारण ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला की अतिवृष्टी समजण्यात यावी, असा शासकीय नियम आहे. अतिवृष्टीमुळे जे आर्थिक नुकसान होईल, त्याची भरपाई राज्य सरकारकडून केली जाते. 

नुकसानभरपाईचे आदेश; ‘रेड झोन’मध्येहीलक्ष घालू : चंद्रकांतदादा पाटीलशहरामध्ये बुधवारी (दि. १३) रात्री कोसळलेल्या धुवाधार पावसामुळे ज्यांचे नुकसान झाले आहे, अशा नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांना दिले आहेत. त्याची नुकसानभरपाई राज्य शासन देईल. शहरातील ‘रेड झोन’मध्येही लक्ष घालू, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी केले. ताराबाई पार्क येथील सर विश्वेश्वरय्या हॉल येथे झालेल्या भाजप-ताराराणी आघाडी पक्ष कार्यकर्ता मेळावा व प्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते.पालकमंत्री म्हणाले, अवकाळी पावसामुळे बुधवारी रात्री ज्या नागरिकांचे नुकसान झाले आहे, ते का झाले याचीही चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना आदेश दिले आहे. रेड झोन हा गंभीर विषय आहे. त्यात हात घालण्याची आवश्यकता आहे. मी तुम्हाला आश्वासित करतो की, या शहरात कोणतेही बेकायदेशीर कृत्य सरकार चालू देणार नाही. रेड झोनसंदर्भात योग्य निर्णय घेऊ.