जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. जिल्ह्यातील २९४ केंद्रांवर हे लसीकरण करण्यात आले. रविवारी जिल्ह्यात ७४ हजार डोस आल्यामुळे सोमवारी दिवसभरामध्ये मोठ्या संख्येने लसीकरणासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. आता पुन्हा मंगळवारी लस कमी पडण्याची शक्यता असून, आता लसीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील ३५ हजार १३० नागरिकांनी सोमवारी पहिला डोस घेतला असून, १५८६८ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.
चौकट -
आतापर्यंतच्या जिल्ह्यातील लसीकरणाची टक्केवारी
विभाग पहिला डोस टक्केवारी दुसरा डोस टक्केवारी
१ आरोग्य कर्मचारी ३९,९१५ १०४ टक्के १९,८०६ ५२ टक्के
२ फ्रंटलाईन, पंचायत राज कर्मचारी ४८,२४३ १६२ टक्के १६,१७१ ५४ टक्के
३ ४५ वर्षांच्या पुढील सर्व नागरिक ७,२४,९८३ ४८ टक्के ६५,६१० ०४ टक्के एकूण ८,१३,१४१ ५१ टक्के १,०१,५८७ ०६ टक्के
कोट -
जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहकार्याने कोल्हापूर जिल्ह्यात लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून उच्चांकी काम केले आहे. हे सर्वजण अभिनंदनास पात्र आहेत.
डॉ. फारूक देसाई,
लसीकरण मोहीम समन्वयक