शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच निवडीला उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:25 IST

कोल्हापूर : राज्यातील सरपंच आरक्षणावरून चालू असलेल्या कायदेशीर लढाईत मंगळवारी उच्च न्यायालयाने २५ व २६ फेब्रुवारीला होणाऱ्या सरपंचांच्या निवडणुकांना ...

कोल्हापूर : राज्यातील सरपंच आरक्षणावरून चालू असलेल्या कायदेशीर लढाईत मंगळवारी उच्च न्यायालयाने २५ व २६ फेब्रुवारीला होणाऱ्या सरपंचांच्या निवडणुकांना हिरवा कंदील दाखविला. परंतु सरपंच निवडी मात्र याचिकेच्या अंतिम निर्णयास अधीन राहून असतील असा आदेश उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश शाहरुख काथावाला व विनय जोशी यांच्या खंडपीठाने दिला. याचिकेची सुनावणी १६ मार्चपर्यंत तहकूब केली.

पुणे, नाशिक, सोलापूर, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील शिरटी, मजरेवाडी व करवीर तालुक्यातील कोगे, खुपिरे या ग्रामपंचायतींच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या हरकती फेटाळल्याने त्यास ॲड. धैर्यशील सुतार व इतर वकिलांमार्फत दाखल केलेल्या याचिकेवर एकत्रित सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांच्यावतीने ॲड धैर्यशील सुतार यांनी ह्या निवडणुका निवडणूक आयोग घेत नसून स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत घेतल्या जातात. त्यामुळे उच्च न्यायालयाला प्रकरणात हस्तक्षेप करण्यास घटनात्मक बाधा येत नाही. सरपंच पदाचे आरक्षण हे नियमाला धरून झाले नाही. त्यामुळे समाजातल्या सर्वच घटकांवर अन्याय होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. राज्य शासनातर्फे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी याचिका चालण्यास पात्र नसल्याचा आक्षेप घेतला. त्यावर न्यायालयाने सध्या सुरू असलेली निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यास हरकत नसल्याचे सांगितले.