शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर, पुण्यात हायकोर्टाचे खंडपीठ

By admin | Updated: October 25, 2015 01:07 IST

मुख्यमंत्र्यांची घोषणा : वकिलांच्या रास्त मागणीस बळकटी

मुंबई : कोल्हापूरबरोबरच पुणे येथेही मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्याची शिफारस राज्य सरकारने उच्च न्यायालयाकडे केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी ‘बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र आणि गोवा’च्या नवव्या राज्य वकील परिषदेचे उद्घाटन करताना ही माहिती दिली. या खंडपीठांसाठी वकील वर्गाने केलेली मागणी रास्त आहे. म्हणूनच आपल्या मंत्रिमंडळाने तसा निर्णय घेऊन शिफारस केली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबई उच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांपैकी २५ टक्के प्रकरणे ही पश्चिम महाराष्ट्राच्या पाच जिल्ह्यांतील आहेत. त्यातही ५० टक्के प्रकरणे ही पुणे येथील असल्याने पुणे येथे खंडपीठ व्हावे, अशीही मागणी लक्षात घेऊन कोल्हापूरसह पुणे येथेही खंडपीठ स्थापन करण्यात येईल. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. शरद बोबडे, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. विद्यासागर कानडे व न्या. आर. व्ही. मोरे, भारताचे अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी, राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे, गोव्याचे अधिवक्ता ए. एन. एस. नाडकर्णी, बार कौन्सिल आॅफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा, मुख्य संयोजक विठ्ठल कोंडे-देशमुख, अध्यक्ष हर्षद निंबाळकर, बार कौन्सिल आॅफ इंडियाचे सदस्य आणि राज्यभरातील वकील उपस्थित होते. राज्याचा विकास करण्यासाठी शासन आणि न्याय व्यवस्था यांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, न्याय प्रक्रिया गतिमान झाल्यास व्यवस्थेवरील ताण कमी होईल आणि कार्यक्षमतेत वाढ होईल. मुंबई येथे उच्च न्यायालयाच्या इमारतीसाठी वांद्रे येथे जागा देण्याचे प्रस्तावित आहे. पुढील तीन-चार वर्षांत तिथे उच्च न्यायालयाची इमारत उभारण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. मुख्य संयोजक कोंडे-देशमुख यांनी दोन लाख ५० हजार रुपयांचा धनादेश, तर परभणी बार कौन्सिल यांनी ७५ हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री साहाय्यता निधीकरिता मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. यावेळी महाराष्ट्रातील वरिष्ठ वकिलांना शाल व मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. कोल्हापूरसाठी मागविली न्यायमूर्र्तींची मते कोल्हापुरात खंडपीठ स्थापन करण्याबाबत आपले मत काय आहे, अशी विचारणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी उच्च न्यायालयाच्या राज्यातील सर्व न्यायमूर्र्तींकडे लेखी स्वरुपात गेल्या महिन्यात केली होती. बहुतेक न्यायमूर्र्तींनी असे खंडपीठ स्थापन करण्याबाबत अनुकू लता दर्शविली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)