शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

डॉल्बी लावण्यासाठी मंडळांची छुपी तयारी

By admin | Updated: September 12, 2016 00:42 IST

पोलिसांची करडी नजर : मंडळांवर जाग्यावर कारवाई - राणे

कोल्हापूर : सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी लावण्यासाठी शहरातील काही मंडळांनी आतापासूनच छुपी तयारी केली आहे. मिरवणुकीत ऐनवेळी ते डॉल्बी घेऊन येणार आहेत. या छुप्या हालचालींची चाहुल पोलिस प्रशासनाला लागली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर जाग्यावरच पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल केले जाणार आहेत. या कारवाईमध्ये डॉल्बीचा वापर करणाऱ्या चालक, मालक, मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी व ज्या वाहनांवर डॉल्बी यंत्रणा ठेवण्यात आली आहे, त्या वाहनांचे चालक, मालक, आदींचा समावेश असेल, अशी माहिती शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांनी रविवारी दिली. डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार जिल्हा पोलिस प्रशासनाने केला आहे. सार्वजनिक तरुण मंडळांची बैठक घेऊन, नियम डावलून डॉल्बी लावणाऱ्या तरुण मंडळांवर कठोर कारवाई करण्याची घोषणा पोलिस प्रशासनाने केली होती. तसेच प्रत्येक मंडळाला लेखी नोटीसही बजाविण्यात आली आहे. निवासी परिसरात ६० डेसिबल इतक्या आवाजाची मर्यादा मंडळांना घालून दिली आहे. तसेच डॉल्बी लावल्याने मानवी आरोग्यावर होणाऱ्या विपरीत परिणामांचे प्रबोधनही केले आहे; परंतु, काही मंडळांनी सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी लावण्याची छुपी तयारी केली आहे. याची चाहुल पोलिस प्रशासनाला लागली आहे. शहर पोलिस उपअधीक्षक राणे यांनी डॉल्बी लावणाऱ्या मंडळांवर जाग्यावरच कारवाई करण्याची तयारी केली आहे. त्यासाठी शहरातील पाचही पोलिस ठाण्यांना कारवाईचे आदेश दिले. गुन्हे शाखेची बैठक सार्वजनिक गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी शहरात नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. या गर्दीचा फायदा घेण्यासाठी चोरट्यांचा वावर वाढणार आहे. तसेच युवती व महिलांची छेडछाड होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे शहरातील लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा, शाहूपुरी व राजारामपुरी पोलिस ठाण्यांच्या गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांची विशेष बैठक पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात घेतली. यावेळी त्यांनी पोलिस उपनिरीक्षक व कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या.