शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

हेर्लेत पत्नीचा कुऱ्हाडीने खून

By admin | Updated: September 12, 2016 01:12 IST

चारित्र्याच्या संशय

हेर्ले/रुकडी : हेर्ले (ता. हातकणंगले) येथे चारित्र्याच्या संशयावरून व आपणास किंमत देत नाही या कारणावरून पती आनंदा सत्तू उलस्वार (वय ६२, रा. बौध्द समाज मंदिराजवळ, हेर्ले) यांनी कुऱ्हाडीने घाव घालून पत्नी सखुबाई (५५) यांचा राहत्या घरी खून केला. खुनानंतर तब्बल पाच तासांनी आनंदा स्वत:च हातकणंगले पोलिसांत हजर झाले. या खुनामुळे हेर्ले येथे खळबळ उडाली आहे. याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, रविवारी सकाळी ७.४५ वाजता आनंदा उलस्वार यांनी पत्नी सखुबाईकडे चहा मागितला. त्यावेळी सखुबार्इंनी आनंदा यांना चहा देणार नाही, काहीही करा, अन्यथा घर सोडून जा, असे सांगितले. या कारणावरून दोघांत वादावादी सुरू झाली. यावेळी सखुबाई अंघोळीसाठी बंबात पाणी तापवत दात घासत होत्या. वाद सुरू होताच सखुबाई यांनी आनंदाच्या अंगावर काहीतरी मारण्यास धावल्या, त्यावेळी शेजारी असलेली कुऱ्हाड घेऊन आनंदा यांनी रागाच्या भरात सखुबार्इंच्या डोक्यात आणि जबड्यात दोन घाव घातले. हे घाव इतके वर्मी होते की, त्या जागीच गतप्राण झाल्या. शेजारी रक्ताचे थारोळे साचले होते, तर कुऱ्हाड तोंडात अडकली होती. खून झाला ती जागा घराशेजारी मागील बाजूस शेताजवळ आहे. त्या ठिकाणी कोणीच नसते. त्यामुळे आरडाओरड कोणास ऐकू (पान १ वरून) आला नाही. खून केल्यानंतर आनंदा रक्ताचे कपडे घालून शिरोलीकडे गेले, नंतर पुन्हा घरी येऊन दुपारी १.३० वाजता हातकणंगले पोलिसांत स्वत:च हजर झाले. पोलिसांनी चौकशी करताच हेरलेतील शेजारी व नागरिकांना या दुर्घटनेची माहिती मिळाली. आनंदा उलस्वार हे पूर्वी गवंडीकाम आणि शेतमजुरीचे काम करत होता. पत्नी सखुबाई, मुलगा अमोल, सून, दोन नातवंडे यांंच्यासोबत रहात होता. मुलगा अमोल हा अब्दुललाट (ता. शिरोळ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्यसेवक म्हणून नोकरीस आहे. मुलगी पन्हाळा तालुक्यातील नावली येथे आहे. अमोल आरोग्य खात्याच्या प्रशिक्षणासाठी सातारा येथे गेला होता. तर चार दिवसापूर्वी गणेशोत्सवानिमित्त सुन आणि नातवंडे गावी गेली होती. त्यामुळे घरात आनंदा व पत्नी दोघेच होते. पत्नीच्या चारित्र्यावरून दोघांत वारंवार भांडण होत होते. रविवारी सकाळीही त्यांच्यात वाद झाले होते. घटनास्थळी पोलिस आल्यानंतर या खुनाची वार्ता गावात समजली. त्यामुळे तेथे बघ्यांची गर्दी झाली होती. या ठिकाणी विभागीय पोलिस उपअधीक्षक रमेश सरवदे, हातकणंगले पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बी. सी. भालके, कॉन्स्टेबल मूर्ती, सरपंच बालेचांद जमादार, उपसरपंच संदीप चौगुले, राजू कचरे, माजी सरपंच रियाज जमादार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. हातकणंगले पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून संशयित आरोपी आनंदा उलस्वार यांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबतचा तपास पोलिस निरीक्षक सी. बी. भालके करीत आहेत. —---------------------- पुतण्याकडे राहिल्या असत्या तर... सखुबाई उलस्वार या शुक्रवारीच कोल्हापूरात सदर बाजारात राहणारा पुतण्या रुपेश नामदेव उलस्वार याच्याकडे गेल्या होत्या, तो त्यांना मुक्कामी राहण्यासाठी विनवणी करीत होता, पण त्याचे न ऐकता त्या हेरले येथे आल्या आणि सकाळी पतीसोबतच्या वादात त्यांचा खून झाला. रुकडी येथील डॉ. कुलकर्णी दाम्पत्याच्या निघृण खूनाच्या घटनेनंतर महिन्यातच हेरले येथे घडलेल्या या खूनाच्या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.