शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

तिची उदंड लेकरे - भाग ३

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:27 IST

एकीने तर त्या तांदुळाची चकलीची भाजणी करून विकली. हरभऱ्याचे फुटाणे फोडून ते विकले. ‘मोदींना फोनवरून हे सगळं कळवूया. फुकट्या ...

एकीने तर त्या तांदुळाची चकलीची भाजणी करून विकली. हरभऱ्याचे फुटाणे फोडून ते विकले.

‘मोदींना फोनवरून हे सगळं कळवूया. फुकट्या थाळ्यासुद्धा बंद व्हायला हव्यात. लोकांना तुम्ही आळशी बनवताय. त्यांना स्वस्त द्या, फुकट नको. श्रम केल्यानंतरच अन्न पचतं नि अन्नाची किंमत कळते.’

हा उपाय सर्वांना पटला; पण तो लगेच होणारा नव्हता. ‘आपले राणेसाहेब आता दिल्लीत गेल्यामुळे हा निरोप मोदींपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली.’ वाडेकर म्हणाले. आपली समस्या काही पुरुषमंडळींना तरी समजली, ह्याचं जमलेल्या स्त्रियांना समाधान झालं. अन्न उरू नये म्हणून प्रत्येक गृहिणीने आपल्या पातळीवर उपाय शोधावा असं ठरलं.

पुरुष आपापसात बोलत होते. ‘देशात, महापूर, नद्याजोड प्रकल्प असे केव्हढे मोठे प्रॉब्लेम्स आहेत नि ह्या बायकांचा किती क्षुल्लक प्रॉब्लेम, नि केव्हढी ओरड. अन्न कमी शिजवा म्हणावं, आम्हाला नाही उरलं तर आम्ही बाहेर जाऊ. तेव्हढाच बदल. होय की नाही इनामदार?’

आणि कॉलनीतल्या काही वहिन्यांपर्यंत एक आनंदाची वार्ता पोहचली. काय? तर म्हणे ‘सुशीला निलाखे नावाच्या एक बाई आहेत. त्या पलीकडच्या गल्लीत राहातात. त्यांचं कुटुंब मोठं आहे. त्या तुमच्या घरातलं उरलेलं घेऊन जातील. त्या आपले डबे आणतील. त्यांचा मोबाईल नं. = = = = हा आहे. त्यांना कॉल करून बोलवा.’

हा मेसेज सगळ्या वहिन्यांकडे आला. सगळ्यांना खूप आनंद झाला. सुशीला निलाखेना कॉलवर कॉल येऊ लागले. त्या उरलंसुरलं नेऊ लागल्या. एके दिवशी सुलभाताईंकडे नातीचा वाढदिवस होता. बरीच उराऊर झाली होती. गुलाबजामसारखे टिकणारे जिन्नस त्यांनी फ्रीजमध्ये ठेवले. पण मसालेभात, कोशिंबिरी, बटाट्याची भाजी बरीच उरली होती. त्यानी सुशीला निलाखेना कळवलं, उरलेलं घेऊन मीच येते. त्या स्कूटरवरून खाली उतरल्या. सुशीलाबाई तिथे फेमस होत्या. त्यामुळे घर सापडायला वेळ लागला नाही. ती एक मोठी झोपडपट्टी होती. सुशीलाबाईंबरोबर त्यांचा नवरा काम करीत होता. फाटक्या कपड्यातली, केस न विंचरलेली, शेंबडी, काळी सावळी साताठ मुलं रांगेत बसली होती. साधारण पाच ते दहा वयाची असतील. सुशीलाबाई पत्रावळीवर डब्यातलं अन्न वाढत होत्या. नवरा एकेक पत्रावळ मुलांच्या समोर ठेवत होता. मुलं आशाळभूतपणे त्या पदार्थांकडे बघत होती. सुलभाताईंनी आपण आणलेल्या अन्नाचे डबे सुशीलाबाईंना दिले. मुलं बकबका जेवू लागली होती. ‘बगा, किती भुकेजली हायीत पोरं. कोनाचे आयबा न्हाईत. कोनाचे रानात कामाला जात्यात.. ह्यांना हिथ सोडून. तुमच्या कडून आनलेले सगळे पदार्थ मी गरम करते. आमटी, कढी उकळते. नि ह्यांना वाढते’. मुलं उठली त्यांच्या पत्रावळी सुशीलाबाईच्या नवऱ्याने घट्टमुट्ट गुडाळल्या नि झाडांच्या मुळात टाकल्या. मग दहा-बारा कुत्री आली.’ तुमच्याकडून आलेलं अगदी शिळं, पोरांनी टाकलेलं खरकटं ही कुत्री खातात. ही भटकी म्हणून ह्यांना कोनी घालत न्हाईत. त्यांचं पोट इथे भरतं.’ सुशीलाबाईचा नवरा म्हणाला.

सुलभाताई तो सगळा प्रकार बघतच राहिल्या. ‘निलाखे बाई, तुम्ही फार चांगलं काम करता आहात.

रॉबिन हूड नावाची एक संस्था हेच काम करते. हॉटेल मधलं किंवा विवाह कार्यालयातलं उरलेलं अन्न ते झोपडपट्ट्यांचा शोध घेऊन तिथल्या भुकेलेल्यांना वाढतात. पण मला असं सांगा, ह्या मुलांच्या घरी सरकारी धान्य मिळत नाही?

‘ही भटकी आहेत ना ह्यांच्याकडे रेशनकार्ड न्हाई.’

‘ती तुम्ही कोणती संस्था म्हणता ती आम्हाला ठाऊक न्हाई. आम्ही आमच्या मनाने हे सुरू केलं.

आम्हाला सोताची पोरं न्हाईत. हीच आमची लेकरं.’

‘उदंड लेकरं आहेत की तुम्हाला. आम्हाला सांगा काही मदत हवी तर’, असं म्हणून सुलभाताई घरी आल्या. आपल्या वर्तुळाबाहेर येऊन आपल्यालाही असं काही करता येईल का हा विचार त्यांच्या मनात घोळत राहिला.