राज्य उत्पादन शुल्क पन्हाळा व शाहूवाडी विभागाचे दुय्यम निरीक्षक अतुल पाटील यांनी येथे केले.
बहिरेवाडी (ता. पन्हाळा) येथे सामाजिक व शैक्षणिक बांधीलकीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून समाजातील अशा घटकांना मदत करण्याच्या उद्देशाने समृद्धी फौंडेशनची स्थापना करण्यात आली. वारणानगर येथील वारणा चैतन्य विशेष मुलांच्या शाळेत विद्यार्थ्यांना सर्वप्रथम शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले. विपुल खुपेरकर यांनी स्वागत केले. अध्यक्ष विपुल खुपेरकर, उपाध्यक्षा अनुराधा पाटील, जयश्री कुलकर्णी, मुख्याध्यापक मनोज शेट्ये यांच्या हस्ते ५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साधनाचे व साहित्याचे वाटप करण्यात आले. मुख्याध्यापक मनोज शेट्ये यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक व संस्थेचे संचालक उपस्थित होते.
फोटो ओळी....
बहिरेवाडी येथील समृद्धी फौंडेशनच्या वारणा चैतन्य शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक अतुल पाटील, उपाध्यक्षा अनुराधा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्ष विपुल खुपेरकर, जयश्री कुलकर्णी, मुख्याध्यापक मनोज शेट्ये व विद्यार्थी उपस्थित होते.
फोटोसह-