पोर्ले तर्फ ठाणे : आसुर्ले-पोर्ले (ता. पन्हाळा) येथील दत्त (दालमिया भारत शुगर) साखर कारखान्याचे ऊसतोड मजूर दिग्विजय कृष्णात पोवार (वय २५, रा. हणमंतवाडी, ता. करवी) यांचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला होता. या ऊसतोड मजुराच्या नातेवाईकांना युनायटेड इंडिया विमा कंपनीकडून दालमियाच्यावतीने तीन लाखांचा धनादेश देण्यात आला. हा विम्याचा धनादेश कंपनीचे जनरल मॅनेजर (केन) श्रीधर गोसावी यांच्या हस्ते दिग्विजयचे वडील कृष्णात पोवार यांच्याकडे देण्यात आला. दालमिया कंपनीकडून ऊस तोडणी-ओढणी मजुरांचा एक वर्षासाठी अपघाती विमा उतरवला जातो. आतापर्यंत कारखान्याच्या माध्यमातून ३ ऊसतोड मजुरांना विम्याचा लाभ मिळाला आहे. तसेच हंगामात ऊस वाहतूक करताना झालेल्या अपघातात बैलांनाही विम्याची रक्कम मिळाली आहे. यावेळी जनरल मॅनेजर (केन) श्रीधर गोसावी, वरिष्ठ व्यवस्थापक (केन) संग्राम पाटील, व्यवस्थापक (केन) शिवप्रसाद देसाई, पी. के. पाटील, एम. एम. पाटील, तानाजी पोवार, आर. के. संकपाळ, अनिल कांबळे, भुजंग पाटील, एम. के. कदम, यशवंत पाटील, खंडू मोरे, अक्षय पोवार आदी उपस्थित होते.
मृत्यूमुखी पडलेल्या ऊसतोड मजुराच्या नातेवाईकांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:00 IST