शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

‘अमृत’च्या कुटुंबासाठी सरसावले मदतीचे हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चंदगड : नोकरीनिमित्त पुणे येथे वास्तव्याला असलेल्या म्हाळेवाडी (ता. चंदगड) येथील अमृत धोंडिबा दळवी या युवकाचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

चंदगड : नोकरीनिमित्त पुणे येथे वास्तव्याला असलेल्या म्हाळेवाडी (ता. चंदगड) येथील अमृत धोंडिबा दळवी या युवकाचे २७ एप्रिल २०२१ रोजी आकस्मिक निधन झाले. अमृतच्या जाण्याने त्याचे आई, वडील, पत्नी, दोन लहान मुलगे यांच्यावर आभाळच कोसळले. कर्त्या मुलाच्या आकस्मिक निधनाने उघड्यावर पडलेल्या दळवी कुटुंबीयांना आधार देण्यासाठी ग्रामस्थ, मित्रमंडळी व अमृतच्या वर्गमित्रांनी पुढाकार घेतला. ‘आम्ही म्हाळेवाडीकर’ नावाने सुरू असलेल्या व्हाॅट्सअ‍ॅप ग्रुपद्वारे मयत अमृतच्या मुलांच्या शिक्षणासाठी हातभार लावावा, यासाठी मदतीचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला ग्रामस्थ व मित्रमंडळींनी चांगला प्रतिसाद दिला. अमृतच्या मित्रांनी ५१ हजार रुपये जमा केले. ग्रामस्थ व मित्रमंडळी, दानशूर व्यक्तींनी २ लाख रूपये मदत करून बेताची परिस्थिती असलेल्या अमृतच्या कुटुंबीयांना मदतीचा मोलाचा हातभार लावला. म्हाळेवाडी येथे एका कार्यक्रमात हा जमा झालेला निधी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते मयत अमृतचे वडील व लहान मुलांकडे सुपूर्द करण्यात आला. दोन लाख ११ हजार रुपयांच्या मुलांच्या नावे ठेव पावत्या व उदरनिर्वाहासाठी या कुटुंबाला रोख ४० हजार रूपये देण्यात आले.

फोटो ओळी : म्हाळेवाडी (ता. चंदगड) येथे मयत अमृत दळवी यांच्या कुटुंबीयांना आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.

क्रमांक : १६०७२०२१-गड-०३