शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक बांधीलकीतून राजमाता जिजाऊ हॉस्पिटलसाठी मदत करा

By admin | Updated: June 5, 2017 00:46 IST

सामाजिक बांधीलकीतून राजमाताजिजाऊ हॉस्पिटलसाठी मदत करा

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर शहरात सुरू होणाऱ्या ‘राजमाता जिजाऊ को-आॅप. हॉस्पिटल’ला सामाजिक बांधीलकीतून मदत करा, असे आवाहन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केले. उद्योजकांबरोबरच मोठ्या सहकारी संस्थांकडून भाग भांडवल घेऊन गोरगरीब रुग्णांना मोफत सेवा द्या, असेही त्यांनी सागिंतले. सहकार विभागाच्या वतीने कावळा नाका येथे ‘राजमाता जिजाऊ को-आॅप. हॉस्पिटल’ सुरू होत आहे. त्याची आढावा बैठक मंत्री देशमुख यांनी रविवारी घेतली. सामान्य माणसाकडून एक हजाराचा शेअर्स घेऊन त्यांना उपचारांत कितीशी सवलत देणार? वैद्यकीय क्षेत्राशी स्पर्धा करीत चांगली सेवा द्यायची म्हटले तर सवलतीवर मर्यादा येणार आहे. त्यासाठी मोठ्या संस्था व उद्योजकांनी भाग भांडवल द्यावे. कोल्हापूरकरांनी मनात आणले तर काहीच अशक्य नाही. आपल्या व्यवसायातील अगदी अत्यल्प निधी हॉस्पिटलसाठी दिला तर चांगले हॉस्पिटल उभे राहील, असे मंत्री देशमुख यांनी सांगितले. संकल्पना चांगली आहे; पण हे हॉस्पिटल नियमित हॉस्पिटलप्रमाणे सुरू केले तर त्याचा फायदा सामान्यांना होणार नाही. त्यापेक्षा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभे राहिले तर अधिक चांगले असल्याचे डॉ. अशोक चौगुले यांनी सांगितले. हॉस्पिटलचे प्रवर्तक डॉ. अभिजित सूर्यवंशी, ‘गोकुळ’चे संचालक अरुण डोंंगळे, अनिल नागराळे, सुरेंद्र जैन, अविनाश महागांवकर यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी हॉस्पिटलची संकल्पना सांगितली. सुनील सूर्यवंशी यांनी आभार मानले. यावेळी ‘म्हाडा’, पुणेचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, प्रा. संजय मंडलिक, बाबा देसाई, संदीप देसाई, नूपुर खाडे, नामदेवराव भोईटे, पंडितराव केणे, संजय जोशी, आर. डी. देसाई, आदी उपस्थित होते. ‘त्या’ संस्था मोडकळीस आल्या!केवळ सरकारी मदतीवर उभ्या राहिलेल्या संस्था लवकर मोडकळीस येतात, हा अनुभव आहे. त्यासाठी सरकारी पैशांबरोबर जनता असेल तर त्याला यश येते, असे देशमुख यांनी सांगितले. सुरेश पाटील यांच्याकडून एक लाखउद्योजक सुरेश पाटील यांनी हॉस्पिटल उभारणीसाठी एक लाख रुपये मदत जाहीर केली. त्याचबरोबर ‘बिद्री’ साखर कारखान्याने ४८८ कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ४ लाख ९८ हजारांचे भाग भांडवल जमा केले. परदेशात पैसे ठेवायला पैसे मोजावे लागतातपरदेशात उद्योजकांना चार टक्के दराने कर्जे दिली जातात. त्याच धर्तीवर आपल्याकडे द्यावीत, अशी मागणी सुरेंद्र जैन यांनी केली. यावर परदेशात कमी व्याजाने कर्जे दिली जातात, हे जरी खरे असले तरी तिथे पैसा इतका आहे, की पैसे ठेवण्यासाठीही पैसे मोजावे लागतात, असे मंत्री देशमुख यांनी सांगितले.