शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

‘हेल्मेट’ ओझे नव्हे ‘जीवरक्षक’च

By admin | Updated: February 8, 2016 00:29 IST

‘सर सलामत तो पगडी पचास’ : जिल्ह्यात आठ लाख ९२ हजार दुचाकी धावतात

कोल्हापूर : दुचाकीस्वाराचा रस्ते अपघातात मृत्यू, असे सातत्याने वृत्तपत्रात आपण नेहमीच वाचत असतो. सातत्याने होणाऱ्या अपघातात युवापिढीच बळी पडत आहे. हाच सुरक्षिततेचा मुद्दा उचलून सर्वोच्च न्यायालयाने राज्यात सर्वत्र दुचाकीस्वारांना ‘हेल्मेट’ सक्तीचे करण्याचे निर्देश राज्य शासनाला दिले आहेत. त्यानुसार आता कोल्हापुरातही येत्या काही दिवसांत ‘हेल्मेट’ वापरणे सक्तीचे होणार आहे. सक्तीपेक्षा जीव मोलाचा म्हणून स्वेच्छेने ‘हेल्मेट’ वापरणे काळाची गरज आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे राज्य शासनाने ठरविले आहे. त्यानुसार परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी औरंगाबाद येथून ‘हेल्मेट’ सक्तीचे निर्देश दिले. त्यानुसार आता टप्प्याटप्प्याने दिवसागणिक राज्यात सर्वत्र हेल्मेट सक्ती करण्यास सुरुवात केली आहे. हेल्मेट हे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. त्यात दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन जावे लागते. अनेक अपघातांमध्ये डोक्याला दुखापत होऊन दुचाकीस्वारांना व त्या पाठीमागे बसलेल्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांनी ‘सर सलामत तो पगडी पचास’ असे म्हणत हेल्मेट घ्यावे. हेल्मेट घेताना ते चांगल्या गुणवत्तेचे, दर्जाचे असावे. राज्य शासनाने तर नवीन दुचाकी घेतली की, त्या ग्राहकाला दोन हेल्मेट कंपनीनेच मोफत द्यावीत, असा आग्रह धरला आहे. सक्ती नव्हे : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन पुण्यामध्ये १ फेबु्रवारीपासून हेल्मेट सक्ती करण्यात आली. यात हेल्मेट परिधान करणाऱ्या दुचाकीस्वारांचे वाहतूक शाखेच्यावतीने गुलाबपुष्प देऊन अभिनंदनही करण्यात आले. औरंगाबादमध्ये तर जनतेनेच उत्स्फूर्तपणे हेल्मेट खरेदीला सुरुवात केली आहे. यासह मुंबईतही हेल्मेट सक्तीचा प्रयोग ९० टक्के यशस्वी झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत राज्य शासनाला निर्देश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी राज्य शासन करीत आहे. त्यामुळे याला सक्ती म्हणता येणार नाही. विशेष म्हणजे, कायद्यातच अशी तरतूद आहे. त्यामुळे जिवापेक्षा काहीही महत्त्वाचे नसते. त्यामुळे दुचाकीस्वारांनी हेल्मेट नियमित वापरावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे सर्व दुचाकीस्वारांना केले आहे.