शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नरके, महाडिक, सरुडकरांची प्रतिष्ठा पणाला-- ग्रामपंचायतीचे रणांगण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 00:56 IST

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गणेशोत्सवाची धामधूम संपते न संपते तोच ग्रामपंचायतीची धूम सुरू झाल्याने ग्रामीण भागातील राजकारण चांगलेच तापणार आहे. जिल्ह्यातील ४७८ ग्रामपंचायतींच्या आखाड्यात इच्छुकांनी शड्डू ठोकल्याने स्थानिक राजकारण गतिमान झाले आहे. विधानसभेसाठी अजून दोन वर्र्षांचा कालावधी असला तरी, ही निवडणूक जिल्ह्यातील आजी-माजी आमदार, खासदारांचा कस लावणारी आहे. ...

ठळक मुद्दे: संजय घाटगे, निवेदिता माने, ‘के. पी.’, दिनकरराव जाधवांचा कस लागणारसदस्यांना स्वत:च्या ताकदीवरच निवडून यावे लागणार आहे.जिल्हा परिषद, गोकुळ, जिल्हा बॅँकेच्या आजी-माजी संचालकांचाही गाव ताब्यात ठेवण्यासाठी कस लागणार

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गणेशोत्सवाची धामधूम संपते न संपते तोच ग्रामपंचायतीची धूम सुरू झाल्याने ग्रामीण भागातील राजकारण चांगलेच तापणार आहे. जिल्ह्यातील ४७८ ग्रामपंचायतींच्या आखाड्यात इच्छुकांनी शड्डू ठोकल्याने स्थानिक राजकारण गतिमान झाले आहे. विधानसभेसाठी अजून दोन वर्र्षांचा कालावधी असला तरी, ही निवडणूक जिल्ह्यातील आजी-माजी आमदार, खासदारांचा कस लावणारी आहे. आमदार चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील-सरुडकर, अमल महाडिक यांच्यासह माजी आमदार के. पी. पाटील, संजयबाबा घाटगे, दिनकरराव जाधव व माजी खासदार निवेदिता माने यांची आपले गाव ताब्यात ठेवण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

केंद्र व राज्य सरकारकडून मिळणारा विकासाचा निधी थेट ग्रामपंचायतीच्या पातळीवर येतो. स्थानिक पातळीवर विकासात्मक कामांच्या माध्यमातून वेगळा ठसा उमटविण्याची संधी मिळत असल्याने पंचायत समिती, जिल्हा परिषदेपेक्षा ग्रामपंचायत निवडणुकीला अलीकडे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यात थेट सरपंच निवडीबरोबरच गावचा विकास आराखडा तयार करणे व त्यानुसार खर्च करण्याचे अधिकार सरपंचाला मिळाल्याने यावेळची निवडणूक प्रतिष्ठेची व चुरशीची होणार आहे.

गणेशोत्सवाची धामधूम संपत असतानाच ग्रामपंचायतीची रणधुमाळी सुरू झाल्याने इच्छुकांसह स्थानिक नेत्यांची तारांबळ उडाली आहे. उमेदवारी निश्चितीबरोबरच राखीव गटातील उमेदवारांचे जातीच्या दाखल्यांची शोधाशोध सुरू झाली आहे. प्रभागातील इच्छुकांशी चर्चा सुरू झाल्या असून ,एकापेक्षा अधिक इच्छुक असणाºया प्रभागात समझोता कसा करायचा, याचे डावपेच आखले जात आहेत. नाराज होऊन चांगला उमेदवार विरोधकांच्या हाताला लागू नये, यासाठी सुरुवातीपासूनच नेत्यांनी सावध भूमिका घेत उमेदवारीबाबत ‘बघूया, फॉर्म तरी भरा’ असा सूर लावला आहे.विधानसभेसाठी अजून दोन वर्षांचा कालावधी असला तरी ग्रामपंचायत निवडणुकीचा सर्वांत मोठा टप्पा आता होत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ग्रामपंचायती आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी स्थानिक नेत्यांबरोबरच आमदार व माजी आमदारांचे प्रयत्न सुरू आहेत. ज्याच्याकडे सर्वाधिक सदस्य संख्या त्याला घराघरांपर्यंत प्रचार यंत्रणा राबविण्यास सोपे जाते.

मतदारसंघातील ग्रामपंचायतीबरोबरच आमदार व माजी आमदारांना स्वत:चे ग्रामपंचायतीवर वर्चस्व राखावे लागणार आहे. आमदार चंद्रदीप नरके यांच्या कसबा बोरगाव, आमदार सत्यजित पाटील यांच्या सरूड, आमदार अमल महाडिक यांच्या शिरोली, माजी आमदार के. पी. पाटील यांची मुदाळ, संजयबाबा घाटगे यांची व्हनाळी, दिनकरराव जाधव यांची तिरवडे व माजी खासदार निवेदिता माने यांची रुकडी येथे प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. त्याशिवाय जिल्हा परिषद, गोकुळ, जिल्हा बॅँकेच्या आजी-माजी संचालकांचाही गाव ताब्यात ठेवण्यासाठी कस लागणार आहे.इच्छुकांची गणेशोत्सवातच ‘ब्रँडिंग’!ग्रामपंचायतीची प्रभाग रचना व आरक्षण दोन महिन्यांपूर्वीच निश्चित झाल्याने इच्छुक चाचपणी करीत कामाला लागले होते. गणेशोत्सवात तर इच्छुकांनी तरुण मंडळाच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन करीत स्वत:चे ब्रॅँडिंग करण्याची संधी सोडली नाही.एकगठ्ठा मतांवरच उमेदवारी!उमेदवारीबाबत कोणी कितीही दावे प्रतिदावे केले तरी प्रभागात कोणत्या समाजाची किती मते आहेत, त्यातील सर्वाधिक मते खेचण्याची क्षमता कोणाकडे आहे, भावकी कोणाची मोठी, यावरच उमेदवारीची गणिते अवलंबून राहणार आहेत.‘खुल्या सरपंच’ गावात संघर्षपूर्ण लढतसंवेदनशील गावाबरोबरच ज्या ठिकाणी सरपंच पद खुले आहे, त्याठिकाणी संघर्षपूर्ण लढती पाहावयास मिळणार आहेत. बहुतेक ठिकाणी नेत्यांच्या घरातीलच उमेदवार असल्याने येथे मोठ्या अर्थपूर्ण व काटा लढती होणार हे मात्र निश्चित आहे.सदस्यांचे महत्त्व कमीनगरपालिका निवडणुकीत सगळी ताकद नगराध्यक्षपदासाठी लावली होती. त्याप्रमाणे ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक नेते सगळी ताकद सरपंचपदासाठी लावणार हे मात्र निश्चित आहे. सदस्यांना फारसे अधिकार राहिले नाहीत, त्यात नेते लक्ष देणार नसल्याने सदस्यांना स्वत:च्या ताकदीवरच निवडून यावे लागणार आहे.