शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

हेलियम डेला विजयदुर्ग दिनाची जोड

By admin | Updated: April 3, 2017 18:52 IST

पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांची घोषणा

आॅनलाईन लोकमतसिंधुदुर्गनगरी, दि. ३ : विश्वाला अभिमान वाटेल असे सुंदर पर्यटन सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. सिंधुदुर्ग विजयदुर्ग असे दुर्ग या जिल्ह्यात आहेत. सुंदर सागरी किनारे आहेत. मालवणी जेवण, फळांचा राजा हापूस आंबा, काजू, कोकम ही फळे आहेत. या सर्वांबरोबरच जिल्ह्याच्या पर्यटनाचे ब्रँडींग आवश्यक आहे. आॅगस्ट महिन्यात हेलियम डे साजरा केला जातो. या अनुषंगाने विजयदुर्गचे ब्रँडींग होण्यासाठी हेलियम डेला विजयदुर्ग दिनाचे जोड देऊन महोत्सवाचे आयोजन पर्यटन विभागामार्फत आयोजनाचा प्रयत्न करू अशी ग्वाही पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी विजयदुर्ग येथे दिली

पर्यटनमंत्री रावल यांनी भर दुपारी उन्हात सुमारे पाऊण तास विजयदुर्ग किल्ल्याची पाहणी केली तसेच ग्रामस्थांशी संवाद साधला. या भेटीच्या वेळी पालकमंत्री दीपक केसरकर, माजी आमदार सर्वश्री प्रमोद जठार, अजित गोगटे, राजन तेली, संदेश पारकर, सभापती जयश्री आडीवरेकर, उपसभापती संजय देवरूखकर, पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक गोविंद राज, सह व्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड, वरिष्ठ व्यवस्थापक सुबोध किन्हळेकर, प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण, प्रकल्प संचालक दीपक माने, किरण सुलाखे, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, तहसिलदार वनिता पाटील, इतिहासप्रेमी राजेंद्र परूळेकर, ग्रामस्थ उपस्थित होते.

देवगड किल्ल्याची पाहणीविजयदुर्ग किल्ल्याच्या पाहणीनंतर पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी देवगड किल्ल्याला भेट दिली. स्वदेश दर्शन अंतर्गत ६ कोटी ४७ लक्ष रूपयांची विविध विकास कामे या देवगड किल्ल्यावर होणार असल्याची त्यांनी माहिती दिली. देवगड किल्ल्यावर निरीक्षण मनोरा, माहिती केंद्र, उपहारगृह आदी सुविधा पर्यटकांसाठी होणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यानंतर मोंड येथील गुरूनाथ मोंडकर यांच्या साई बोटींग सर्व्हिसचा शुभारंभ पर्यटनमंत्री रावल यांच्या हस्ते व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देवगड बंदर जेटी येथे करण्यात आला. या बोटीतून उपस्थित सागर सफारीही केली.

कुणकेश्वर पर्यटन संकुलाचे लोकार्पण

कुणकेवश्वर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या पर्यटन संकुलाचे लोकार्पण पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले. कुणकेवश्वर पर्यटन संकुलप्रमाणे जिल्ह्यात आठ ठिकणी पर्यटन महामंडळामार्फत पर्यटक संकुल उभारले जात असल्याचे स्पष्ट करून पर्यटन मंत्री रावल यावेळी म्हणाले की, पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सिंधुदुर्गातील निसर्ग सौंदयाचे ब्रँडिंग करायला हवे. हिमालयातील बर्फ वगळता अन्य सर्व निसर्ग सौंदर्य या जिल्ह्यात आहे. पर्यटनातून सर्वाधिक रोजगार संधी उपलब्ध होतात.

यानंतर मिठबांव येथील नियोजित पर्यटन संकुलास भेट देऊन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी या प्रकल्पांतर्गत उभ्या राहत असलेल्या विविध इमारतींची पाहणी केली.