शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

वारस..बेवारस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 00:37 IST

- चंद्रकांत कित्तुरेसध्याच्या गतिमान युगात सगळेच गतिमान झाले आहेत. एकमेकांसाठी द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही. आपली संस्कृती एकत्र कुटुंब पद्धतीने राहण्याची. तीही आता लयाला जाऊ पाहात आहे. ग्रामीण भागात ती थोडीफार दिसत असली तरी शहरी भागात मात्र एकत्र कुटुंबे अभावानेच आढळतात. लग्नानंतर अगदी आई-वडीलही घरात नकोसे वाटू लागतात. त्यातूनच घरामध्ये भांड्याला ...

- चंद्रकांत कित्तुरेसध्याच्या गतिमान युगात सगळेच गतिमान झाले आहेत. एकमेकांसाठी द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही. आपली संस्कृती एकत्र कुटुंब पद्धतीने राहण्याची. तीही आता लयाला जाऊ पाहात आहे. ग्रामीण भागात ती थोडीफार दिसत असली तरी शहरी भागात मात्र एकत्र कुटुंबे अभावानेच आढळतात. लग्नानंतर अगदी आई-वडीलही घरात नकोसे वाटू लागतात. त्यातूनच घरामध्ये भांड्याला भांडे लागते. सासू-सुनांचा वाद गल्ली-बोळांत चर्चिला जाऊ लागतो. सुशिक्षित कुटुंबांमध्ये आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवण्याचे प्रकारही अलीकडच्या काळात वाढू लागले आहेत. पती-पत्नी दोघेही नोकरी करीत असणे, आई-वडिलांकडे पाहायला कुणी नाही ही सबबही त्यासाठी सांगितली जाते. खरंतर ‘आम्ही दोघं राजा-राणी’चं जीवन त्यांना जगायचं असतं. गेल्या वीस-पंचवीस वर्षांत मुलांना शिक्षणासाठी, नोकरीसाठी परदेशात पाठविण्याचे प्रमाणही भलतेच वाढले आहे. मुले परदेशात आणि त्यांचे जन्मदाते भारतात, अशी अनेक उच्चभ्रू कुटुंबेपाहायला मिळतात. वृद्धापकाळात ज्यांनी आधाराची काठी बनायचे तेच परदेशात असतील तर त्यांच्या आठवणीने झुरण्याशिवाय या माता-पित्यांपुढे पर्याय नसतो. त्यातच पत्नी अथवा पती देवाघरी गेला, तर एकाकीपण खायला उठते. अशावेळी नातेवाइकांचा आधार मिळाला तर ठीक; अन्यथा वृद्धाश्रमाशिवाय पर्याय नसतो. हे सगळे आता सांगायचे कारण म्हणजे नांदेड जिल्ह्यातील बालरोगतज्ज्ञ डॉ. गोधमगावकर यांचा वृद्धाश्रमात झालेला मृत्यू अन् त्यानंतर त्यांच्याबद्दल प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्या. त्यांचा मुलगा, मुलगी दोेघेही अमेरिकेत होते. त्यांनी अंत्यसंस्काराला येण्यास असमर्थता व्यक्त केली. त्यामुळे वृद्धाश्रमचालकांनी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. वारसदार असूनही बेवारसासारखे जाणे त्यांच्या वाट्याला आले. अशा आशयाच्या त्या बातम्या होत्या. त्या वाचून अनेकांची मने हळहळली. वृद्ध मातापिता आणि त्यांची मुले यांच्यातील संबंधावर खूप चर्चा घडवल्या गेल्या. प्रत्यक्षात वस्तुस्थिती मात्र तशी नव्हती. डॉ. धामणगावकर यांच्या लहान बंधूने त्यांच्यावर अंतिम संस्कार केले. यावेळी मुले नसली तरी इतर नातेवाईक हजर होते. अशा आशयाची एक पोस्ट त्यांचे एक नातेवाईक राजेंद्र जोशी यांनी समाजमाध्यमांमध्ये व्हायरल केली आहे. हे खरे असले तरी अशी विपरीत चर्चा व्हायला नको होती, हे मान्यच करावे लागेल. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी पालघर जिल्ह्यातही एक घटना अशीच घडली. एका वृद्ध महिलेच्या निधनानंतर शेजाºयांनी तिच्या अहमदाबाद येथे राहणाºया मुलीशी अन् जावयाशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी आम्हाला वेळ नाही, अंत्यसंस्कार तुम्हीच उरकून घ्या, व्हिडिओ कॉल करून तो आम्हाला दाखवा. तिच्या अस्थी कुरियरने पाठवा असे सांगितले. याला काय म्हणणार. कुठे गेले ते लेकीचे आतडे. जिने नऊ महिने पोटात सांभाळून जन्माला घातले, तिच्याबद्दल असे बोलताना त्यांना काहीच कसे वाटले नसेल की व्यवहाराच्या पलीकडे त्यांना काहीच दिसत नसेल. कोल्हापुरातील वृद्धाश्रमातही अशा घटना कधी-कधी घडतात. जिवंतपणी पाहायलाही कुणी न येणारे नातेवाईक वृद्धाच्या निधनानंतर उगवतात. आपले कसे त्यांच्यावर प्रेम होते ते आक्रोश करून दाखविण्याचा प्रयत्न करतात. मृत वृद्ध पुरुष अथवा महिलेची काही ना काही मालमत्ता असते, त्यावर दावा सांगण्यासाठी त्यांचा हा आटापिटा असल्याचे त्यांच्या त्यानंतरच्या हालचालींवरुन जाणवते. कोल्हापुरातील सावली केअर सेंटरचे किशोर देशपांडे यांनी याबाबतचे दोन किस्सेही सांगितले. यावरून माणुसकी कमी होत चालली आहे का? संस्कार, नितिमत्ता शिकविण्यात आपण कमी पडत आहोत का, याचा विचार समाजानेच केला पाहिजे. सगळीच मुले अशी आहेत असे नाही. मातापित्यांची वर्षानुवर्षे सेवा सुश्रूषा करणारी मुलेही आहेत. सासू-सासºयांना आई-वडिलांसारखे जपणाºया सुनाही आहेत. मात्र, त्यांचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. या सर्वाला कारणीभूत आणखी एक घटक आहे तो म्हणजे पैसा आणि बदलती जीवनशैली. पैसा असेल तर मातापित्यांना वृध्दाश्रमात ठेवायला त्यांना तोशीस पडत नाही. ज्यांची आर्थिक कुवत नाही अशा घरांमध्ये भांडणे वाढतात. त्यातूनच जन्मदात्यांना घराबाहेर काढण्याच्या घटना घडतात. ज्यांना मोठे करून स्थिरस्थावर करण्यासाठी आयुष्याची पुंजी पणाला लावली, त्यांच्यावरच डोक्यावर हात मारून घेत आसºयासाठी नातेवाईकांची घरे शोधण्याची वेळ येते. तेथे लाचारीचे, आश्रिताचे जिणे त्यांच्या वाट्याला येते. हे सर्व बदलण्यासाठी कुणी पुढाकार घ्यायचा, हाच खरा प्रश्न आहे.(लेखक ‘लोकमत’चे उप वृत्तसंपादक आहेत.)