शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

‘आयर्विन’वरील अवजड वाहतुकीस अखेर बंदी

By admin | Updated: August 6, 2016 00:35 IST

सर्व जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट होणार

सांगली : महाडजवळ ब्रिटिशकालीन पूल वाहून गेल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शुक्रवारी तातडीने बैठक घेऊन, सांगलीतील आयर्विन पूल अवजड वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला. एसटीसह सर्वच जड वाहनांना या पुलावर बंदी घालण्यात येणार असून, येत्या २४ तासांत या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी पोलिस व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना शुक्रवारी दिले. जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील जुन्या पुलांच्या स्थितीबाबत चर्चा करण्यात आली. यात सांगलीतील कृष्णा नदीवरील आयर्विन पुलावरील अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुलाचे आयुर्मान पूर्ण झाल्याबाबतचे पत्र यापूर्वीच ब्रिटिश प्रशासनाने पाठविले होते.वण्यापलीकडे कोणतीही कार्यवाही झाली नव्हती. मात्र, महाडच्या दुर्घटनेमुळे जुन्या पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने हा निर्णय घेतला. सांगली संस्थानने पुण्याकडे जाण्यासाठी या पुलाची उभारणी केली होती. या पुलाचे उद्घाटन १८ नोव्हेंबर १९२९ ला गव्हर्नर जनरल लॉर्ड आयर्विन व लेडी आयर्विन यांच्याहस्ते झाले होते. सांगली शहरालगत असलेल्या या आयर्विन पुलाची लांबी ८२० फूट आणि रूंदी ३२ फूट आहे, तर पुलाची उंची ७० फूट आहे. मात्र, गेल्या काही वर्षापासून पुलावरील वाहतुकीत झालेली वाढ आणि पुलावरही दुरवस्था होत होती. पुलाला तडे जाण्याबरोबरच दगडही निसटल्याने धोका वाढत चालला असतानाही प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहिले नव्हते. या पुलाला पर्यायी पूल बायपास रस्त्यावर बांधला असून त्याचा वापर कमी होत आहे. अखेर महाड दुर्घटनेनंतर का होईना, प्रशासनाला जाग येऊन हा निर्णय घेतल्याने सांगलीचे वैभव म्हणून ओळख असलेल्या आयर्विन पुलावरील अतिरिक्त ताण कमी होण्यास मदत होणार आहे. शुक्रवारी झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचाही निर्णय घेण्यात आला. त्याचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात येणार असून, प्रसंगी जिल्हा नियोजन समितीतून निधीची उपलब्धता करून हे आॅडिट पूर्ण करण्यात येणार आहे. अंकली येथील पूल आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे असल्याने त्यांना याबाबतचे निर्देश देण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)फोटो : ०५ एसएन ५ : सांगलीत शुक्रवारी जिल्ह्यातील जुन्या पुलांबाबत बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी डावीकडून महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबुडकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले, अप्पर पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण उपस्थित होते.एसटीच्या तिकीट दरात वाढ होणारआयर्विन पुलावरील अवजड वाहतुकीच्या बंदीमध्ये एसटीचाही समावेश असल्याने बायपास पुलावरून होणाऱ्या वाहतुकीमुळे एसटीची सहा रुपयांची भाडेवाढ होणार आहे. या पुलाच्या वापरामुळे ४.१ किलोमीटर अंतर वाढणार आहे. जुन्या मार्गावरून ३६१ फेऱ्या चालतात. तिकीट दरात वाढ होणार असली तरी, प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वाेच्च प्राधान्य देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.