शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

वीजेच्या कडकडाट्यासह शहरात जोरदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 17:30 IST

कोल्हापूर : वीजेच्या कडकट्यासह शनिवारी दुपारी कोल्हापूर शहराला पावसाने अक्षरशा झोडपून काढले. सुमारे वीस मिनिटे एक सारखा पाऊस राहिल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले. रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले होते.गेले दोन-तीन दिवस जिल्ह्यात जोरदार पाऊस होत आहे. वळीवा सारखा पडेल त्या ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी अजिबातही पडत नाही. गुरूवारी संपुर्ण जिल्ह्यात ...

ठळक मुद्देकोल्हापूरातील रस्त्यांना तळ्याचे स्वरूप शहरातील नागरिकांची चांगलीच तारांबळखरीप पिकांना पोषक पाऊसकागलने सरासरी ओलांडली

कोल्हापूर : वीजेच्या कडकट्यासह शनिवारी दुपारी कोल्हापूर शहराला पावसाने अक्षरशा झोडपून काढले. सुमारे वीस मिनिटे एक सारखा पाऊस राहिल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले. रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले होते.

गेले दोन-तीन दिवस जिल्ह्यात जोरदार पाऊस होत आहे. वळीवा सारखा पडेल त्या ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी अजिबातही पडत नाही. गुरूवारी संपुर्ण जिल्ह्यात धुवॉँदार पाऊस झाला होता, सगळीकडे पाणीच पाणी करून सोडल्याने पाण्यासाठी रस्ताही अपुरा पडत होता.

शुक्रवारी दिवसभर काही ठिकाणचा अपवाद वगळता पाऊस झाला नाही. शनिवारी सकाळ पासून खडखडीत ऊन राहिले. ऊनाचा पारा इतका होता की सकाळी नऊ वाजता अंग भाजून निघत होते. दुपारी बारा नंतर ऊनाची तीव्रता वाढत गेली आणि त्यानंतर अचानक वातावरणात बदल होऊन आकाश दाटून आले.

साधारणता दुपारी सव्वा दोनच्या सुमारास शहरात पावसास सुरूवात झाली. वीजेचा कडकडाट आणि जोरदार कोसळणाºया पावसाने नागरिकांची तारांबळ उडवून दिली. सुमारे वीस मिनिटे कोसळलेल्या पावसाने रस्त्यावर पाणी उभा केल्याने वाहतूक संथ गतीने सुरू राहिली. कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांना मिळेल त्या ठिकाणी आसरा घ्यावा लागला. रस्त्यांना अक्षरशा तळ्याचे स्वरूप आले होते. त्यानंतर हवेत कमालीचा गारवा पसरला.

खरीप पिकांना पोषक पाऊस

सध्या भातासह इतर खरीप पिके परिपक्वतेच्या अवस्थेत आहेत. सध्या पिकांना पाण्याची गरज असून वळीव स्वरूपात का असेना पण जोरदार कोसळणारा पाऊस पोषक आहे.

कागलने सरासरी ओलांडली

गत वर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस कमी झाला आहे. तरीही कागल तालुक्याने सप्टेंबरच्या दुसºया आठवड्यातच आपली सरासरी ओलांडली आहे. कागल मध्ये सरासरी ६४९.६० मिली मीटर पाऊस पडतो, यंदा ६६५.११ मिली मीटर झाला आहे. त्या पाठोपाठा शाहूवाडी तालुक्यात ९५ टक्के पाऊस झाला असून सर्वात कमी हातकणंगले तालुक्यात केवळ ३४ टक्के पाऊस झाला आहे.