शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

कोल्हापूरसह सांगलीत जोरदार पाऊस

By admin | Updated: May 4, 2017 23:37 IST

विजांचा कडकडाट अन् वादळी वारे : वीजपुरवठा खंडित; शिराळ्यात गारपीट

कोल्हापूर : विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह आलेल्या वळीव पावसाने गुरुवारी कोल्हापूरसह सांगलीला झोडपले. सलग दुसऱ्या दिवशी पावसाने या परिसरात हजेरी लावली. गुरुवारी सायंकाळनंतर कोल्हापूर शहरासह आजरा, कागल, करवीर, हातकणंगले, राधानगरी, शाहूवाडी, चंदगड, भुदरगड या तालुक्यात जोरदार पाऊस झाला. कोल्हापूर शहर परिसरात अर्धा तास पाऊस झाला. मलकापूर (ता.शाहूवाडी) येथे पावसाने मोठे नुकसान झाले आहे. झाडे कोसळली, विजेच्या तारा तुटल्या विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह आलेल्या वळीव पावसाने गुरुवारी सांगली शहरासह वाळवा, शिराळा आणि खानापूर तालुक्यांना जोरदार तडाखा दिला. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. विजेच्या तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. शिराळा तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी गारपीट झाली. खानापूर पूर्वभागातही मध्यरात्री गारा पडल्या.सांगली शहरात सायंकाळी साडेचारच्या सुमारास ढगांची दाटी झाल्याने अंधारून आले. त्यानंतर लगेच वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. पावसापेक्षा वादळी वाऱ्याने सर्वांचे हाल झाले. झाडे कोसळून रस्त्यावर पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. वीस मिनिटात वळीवाने जनजीवन विस्कळीत केले. सिंधुदुर्गात दमदार पाऊससिंधुदुर्ग :जिल्ह्यातील बहुतांशी भागात गुरूवारी सायंकाळी मेघगर्जेनेसह दमदार पाऊस झाला. वादळी वाऱ्याने कुडाळ तालुक्यातील शिवापूर आणि परिसरात मोठी पडझड झाली होती. मेघगर्जेनेसह पाऊस पडल्याने सायंकाळी ६ पासून जिल्ह्याच्या सर्वच भागात वीज पुरवठा बंद झाला होता. वैभववाडी, तसेच कणकवली तालुक्यातील तळेरे परिसरात गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. सलग दुसऱ्या दिवशी पाऊस झाल्याने वातावरणात थोडा गारवा निर्माण झाला. मात्र, या पावसाने लग्न सराईसह गावागावातील सार्वजनिक कार्यक्रमांवर विरजण पडले आहे. मोटारीवर झाड कोसळलेनूतन अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख शशिकांत बोराटे यांच्या खासगी मोटारीवर वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळले. पोलिस मुख्यालयातील कृष्णा मॅरेज हॉलसमोर गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. वीज कोसळून बालकाचा मृत्यू; पिता गंभीरचंदगड (जि.कोल्हापूर) : जंगमहट्टी येथे मयूरेश सुरेश तुप्पट (वय ५) या अंगणवाडीतील बालकाचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. ही दुर्घटना गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गावाच्या वेशीत घडली. सुरेश तुकाराम तुप्पट मुलगा मयुरेशसह दुचाकीवरून पाटणेफाटा येथे असलेल्या पत्नीला आणण्यासाठी जात होते. ते गावाच्या वेशीत आल्यानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. यावेळी सुरेश दुचाकी थांबवून एका झाडाखाली थांबले होते. यावेळी या दोघांवर वीजकोसळली. यात सुरेश हे बेशुद्ध पडले, तर मयूरेशचा मृत्यू झाला. शेतात काम करणाऱ्या महिलांनी ही घटना पाहिली. ंअंकलीत भिंत पडून शेतमजूर जागीच ठारसांगली : वादळी वाऱ्यामुळे शेतातील सिमेंटच्या विटांची भिंत अंगावर पडल्याने अंकली येथील श्रीकांत पायगोंडा पाटील (वय ६०) हा शेतकरी जागीच ठार झाला. गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली.