शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

पानसरे हत्या प्रकरणाची सुनावणी २० जुनला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 13:37 IST

ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे हत्याप्रकरणी शनिवारी होणारी सुनावणी दि. २० जुनला ठेवण्यात आली. हा खटला जिल्हा न्यायाधीश डी. व्ही. शेळके यांच्या न्यायालयात सुरू आहे. मुंबई उच्च न्यायालयाने तपास पूर्ण होईपर्यंत खटला चालविण्यास स्थगिती दिली आहे.

ठळक मुद्देमुंबई उच्च न्यायालयाने तपास पूर्ण होईपर्यंत खटला चालविण्यास स्थगिती दिलीतपास अधिकारी तिरुपती काकडे यांनी पानसरे हत्येप्रकरणी तपास सुरु आहे.ते जिवंत आहेत का? याचीच शंका अनेकांना आहे.

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे हत्याप्रकरणी शनिवारी होणारी सुनावणी दि. २० जुनला ठेवण्यात आली. हा खटला जिल्हा न्यायाधीश डी. व्ही. शेळके यांच्या न्यायालयात सुरू आहे. मुंबई उच्च न्यायालयाने तपास पूर्ण होईपर्यंत खटला चालविण्यास स्थगिती दिली आहे.

त्यामुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आलेची माहिती विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी दिली. सुनावणीसाठी संशयित आरोपी समीर गायकवाड, त्याचे वकील समीर पटवर्धन न्यायालयात हजर होते. सुनावणी लांबणीवर पडल्याने ते माघारी सांगली येथे निघून गेले.पानसरे हत्येचा तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू आहे. कोल्हापूर एसआयटी, कर्नाटक एसआयटी आणि सीबीआय असा तिघांचा तपास अंतिम टप्प्यात आहे. संशयीत आरोपींच्या वकीलांनी पानसरे हत्येप्रकरणी काही संशयित आरोपींना अटक केली आहे. त्यामुळे हा खटला चालविण्यात यावा, अशी अपील उच्च न्यायालयात केली होती. परंतु तपास अधिकारी तिरुपती काकडे यांनी पानसरे हत्येप्रकरणी तपास सुरु आहे.

फरार मारेकरी संशयित विनय बाबूराव पवार (वय ४०, रा. उंब्रज, ता. कºहाड, जि. सातारा), सारंग दिलीप अकोळकर ऊर्फ कुलकर्णी (३८, रा. डी. एस. के. चिंतामणी अपार्टमेंट, शनिवार पेठ, पुणे) यांचा शोध सुरु आहे. आणखी काही पुरावे गोळा करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे हा खटला लगेच सुरु करु नये, तपासाला आणखी काही दिवस अवधी द्यावा, अशी विनंती केली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने पानसरे हत्येचा तपास पूर्ण होईपर्यंत खटला चालविण्यास स्थगिती दिली आहे. शनिवारी सुनावणीला विशेष सरकारी वकील राणे, व संशयित आरोपी गायकवाड आणि त्याचे वकील पटवर्धन उपस्थित होते. न्यायाधिश शेळके यांनी उच्च न्यायालयाचे निर्देश समोर ठेऊन ही सुनावणी २० जुनला घेण्यात येईल असे स्पष्ट केले.

‘त्या’ दोघांचा सुगावा नाही....पानसरे यांच्या हत्येप्रकरणातील फरार मारेकरी संशयित विनय पवार व सारंग अकोळकर यांची माहिती देणाऱ्यास राज्य शासनाने ५० लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. तपास यंत्रणेला अद्यापही या दोघांचा सुगावा लागलेला नाही. मडगाव-गोवा बॉम्बस्फोटापासून हे दोघे फरार आहेत. ते जिवंत आहेत का? याचीच शंका अनेकांना आहे. 

टॅग्स :Courtन्यायालयGovind Pansareगोविंद पानसरे