शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

वकिलांच्या आंदोलनावर २१ एप्रिलला सुनावणी

By admin | Updated: March 12, 2016 00:56 IST

सर्किट बेंचप्रश्न : राजेंद्र चव्हाण यांची माहिती; लोक अदालतीवरील बहिष्कार मागे

कोल्हापूर : जिल्हा बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी ‘सर्किट बेंच’प्रश्नी न्यायालयीन कामकाज व लोकअदालतीवर टाकलेला बहिष्काराचा निर्णय मागे घेतलेचा ठराव शुक्रवारी उच्च न्यायालयास सादर केला. दरम्यान, तत्कालीन न्यायमूर्ती मोहित शहा यांची जिल्हा न्यायालयाच्या आवारात प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून त्यांच्या पुतळ्याचे दहन केले होते. न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने खंडपीठ कृती समितीला नोटीस बजावली होती. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक यांनी या मुख्य अर्जावरील अंतिम सुनावणी दि. २१ एप्रिलला निश्चित केली आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. गेली ३० वर्षे सहा जिल्ह्णांतील वकील संघटना मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन होण्यासाठी लढत आहेत. तत्कालीन न्यायमूर्ती मोहित शहा यांनी याबाबतीत निर्णय न घेता निवृत्ती घेतल्याने निराश झालेल्या वकिलांनी जिल्हा न्यायालयाच्या आवारात त्यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून त्यांच्या पुतळ्याचे दहन केले. न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ओक यांनी खंडपीठ कृती समितीला नोटीस बजावली होती. त्यावर बारचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, उपाध्यक्ष प्रशांत चिटणीस, सचिव रवींद्र जानकर यांनी १२ पानी म्हणणे उच्च न्यायालयास सादर केले. यावेळी न्यायाधीश ओक यांनी लोकअदालतीवर टाकलेला बहिष्कार मागे घेऊन तुमचा निर्णय कळवावा, अशा सूचना केल्या होत्या. त्यांच्या सूचनेनुसार सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर या पाच जिल्ह्णांनी लोकअदालतीवरील बहिष्कार मागे घेतला. त्यामुळे जिल्हा बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनीही एकमत करत बहिष्काराचा मागे घेण्याचा ठराव केला. त्याची प्रत उच्च न्यायालयास सादर केली. यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. अनिल साखरे, तेजपाल इंगळे, संदीप कोरेगावे यांनी जिल्हा बार असोसिएशनतर्फे बाजू मांडली. त्यावर न्यायाधीश ओक यांनी दि. २१ एप्रिलला अंतिम सुनावणीची तारीख निश्चित केली. यावेळी असोसिएशनने अध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र चव्हाण, प्रशांत चिटणीस, मिलिंद जोशी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)