शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

अश्विनी रामाणे, देसाई यांच्याबाबत सुनावणी पूर्ण

By admin | Updated: July 29, 2016 01:06 IST

नगरसेवक जातपडताळणी : पुढील सुनावणी ४ आॅगस्टला

कोल्हापूर : महापौर अश्विनी रामाणे, नीलेश देसाई यांच्या जातपडताळणीबाबत विभागीय जातपडताळणी समितीने दिलेल्या निर्णयाबाबत उच्च न्यायालयात न्यायाधीश शंतनू केमकर व एम. एस. कर्णिक यांच्यासमोर सुरू असलेली सुनावणी गुरुवारी पूर्ण झाली, तर संतोष गायकवाड यांच्या संदर्भातील सुनावणी अपूर्ण राहिली. त्यापुढील सुनावणी आता दि. ४ आॅगस्टला होणार आहे.महापौर रामाणे, महिला बालकल्याण सभापती वृषाली कदम यांच्यासह डॉ. संदीप नेजदार, दीपा दिलीप मगदूम (काँग्रेस), सचिन पाटील (राष्ट्रवादी), संतोष गायकवाड (भाजप), नीलेश देसाई (ताराराणी आघाडी) यांचे जातीचे दाखले विभागीय जातपडताळणी समितीने रद्द केले आहेत. त्याविरोधात सर्वांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यानुसार न्यायमूर्ती केमकर आणि कर्णिक यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. गुरुवारी न्यायालयात महापौर रामाणे यांनी त्यांची वंशावळ व त्याचे पुरावे सादर करताना जुने सात-बारा उतारेही सादर केले. रामाणे यांच्यावतीने अ‍ॅड. अनिल अंतुरकर यांनी बाजू मांडली. जातपडताळणी समितीने केलेली कारवाई चुकीची आहे, असे अ‍ॅड. अंतुरकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले; पण समितीने त्यांचा जातीचा दाखला रद्द करण्याची कारवाई योग्य असल्याचे असे सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी पुन्हा सांगितले, तर नीलेश देसाई यांच्या जातीच्या दाखल्याबाबत दोन्ही बाजूंनी युक्तिवाद करण्यात आले. देसाई यांच्यावतीने अ‍ॅड. रामचंद्र मेंदाडकर-पाटील यांनी बाजू मांडली. दोघांच्या बाबतची सुनावणी पूर्ण झाली, तर संतोष गायकवाड यांच्यासंदर्भातील बाजू त्यांच्या वकिलांनी मांडली; पण गायकवाड यांच्याबाबतची सुनावणी अपूर्ण राहिल्याने ती दि. ४ आॅगस्टला घेण्यात येणार आहे. यापुढील सुनावणी दि. ४ आॅगस्टला होणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. प्रत्येक नगरसेवकाच्या याचिकेवर स्वतंत्रपणे सुनावणी होणार आहे. (प्रतिनिधी)