शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

तंदुरुस्ती देणाऱ्या शाळा सुरू करणार

By admin | Updated: March 21, 2017 01:00 IST

सुभाष सासने : १२ जूनला सुरुवात, आॅलिम्पिक २०४० ची तयारी

कोल्हापूर : ‘आॅलिम्पिक २०४०’मध्ये देशासाठी १०० पदके मिळविण्याकरिता खेळ क्रांतीचा नारा देऊन मुलांना तंदुरुस्तीचे धडे देणाऱ्या (पीपीएफएनएस स्कूल) ५० शाळा १२ जूनला एकाच दिवशी सुरू करण्यात येणार आहेत. जिल्ह्णातील २३ ठिकाणी या स्कूलच्या शाखाही सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.सासने म्हणाले, आॅलिम्पिक २०४० मध्ये १०० पदके मिळविण्यासाठी खेळ क्रांतीचा नारा देऊन प्री-प्रायमरी फिटनेस अ‍ॅँड स्पोर्टस् मॉडेलची सुरुवात ५ आॅगस्ट २०१६ ला जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या मदतीने केली. जिल्ह्णातील ४००० अंगणवाड्यांतील दोन लाख मुलांना फिटनेसचे धडे देऊन यासाठी पुढाकार घेण्यात आला.‘पीपीएफएनएस’ स्कूल म्हणजे मुलांना तंदुरुस्तीचे धडे देणाऱ्या ५० शाळा १२ जूनला सुरू करण्यात येणार आहेत. जिल्ह्णाची लोकसंख्या व शहरांची पाहणी करून या शाळा सुरू केल्या जाणार आहेत. या शाळांमध्ये अंतर्गत चाचणी स्पर्धा वरचेवर घेतल्या जाणार आहेत. या शाळांमध्ये १०० प्रकारचे खेळ शिकविले जाणार आहेत. सहा वर्षांच्या आतील मुलांना सकाळी नऊपूर्वी व सायंकाळी चारनंतर तंदुरुस्ती व खेळासह शिक्षणही दिले जाणार आहे.ते पुढे म्हणाले, आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळेतील तीन लाख मुलांना तंदुरुस्तीचे प्रशिक्षण दिले आहे. जिल्ह्णात ‘पीपीएफएनएस’च्या २३ ठिकाणी शाखाही सुरू केल्या जाणार आहेत. याबाबत कागल, मुरगूड व सेनापती कापशी येथून काहींनी संपर्क साधूनविचारणा केली आहे.जिल्ह्यात या ठिकाणी होणार शाखाकोल्हापूर शहर, कोल्हापूर ग्रामीण, आजरा, भुदरगड, चंदगड, गडहिंग्लज, गगनबावडा, हातकणंगले, कागल, पन्हाळा, राधानगरी, शाहूवाडी, मुरगूड, इचलकरंजी, जयसिंगपूर, कुरुंदवाड, हुपरी, मलकापूर, वारणा-कोडोली, पेठवडगाव, सेनापती कापशी, सैनिक टाकळी, राशिवडे.