शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य यंत्रणाच मृत्युशय्येवर...!

By admin | Updated: November 22, 2014 00:07 IST

प्राथमिक आरोग्य केंद्र : ४४ जागा रिक्त; तीन तालुके अधिकाऱ्यांविना

भीमगोंडा देसाई- कोल्हापूर -जिल्ह्यातील ३७ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ४४ आरोग्य अधिकारी (डॉक्टर) यांच्या जागा रिक्त आहेत. तीन तालुका आरोग्याधिकारी पदे रिक्त आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणाच मृत्युशय्येवर असल्याचे पहायला मिळत आहे. आरोग्य केंद्रात डॉक्टर नसल्यामुळे खेड्यातील रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. परिणामी सर्वाधिक फटका गरीब, सर्वसामान्य रुग्णांना बसत आहे. आरोग्य केंदे्र आहेत, मात्र डॉक्टर नाहीत, असे चित्र आहे. रुग्णांना ‘डॉक्टर देता का डॉक्टर?...’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.ग्रामीण जनतेला आरोग्याची सेवा मिळावी, यासाठी शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू केले. सर्वसाधारणपणे ३० हजार लोकसंख्येला एक प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पाच हजार लोकसंख्येला एक उपकेंद्र असे प्रमाण आहे. प्रत्येक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा मंजूर आहेत. आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारीच कार्यक्षेत्रातील उपकेंद्रात रुग्णांना सेवा देत असतात. परंतु, जिल्ह्यातील निम्म्यापेक्षा अधिक प्राथमिक आरोग्य केंद्रांत पुरसे डॉक्टर नसल्यामुळे आरोग्यसेवेचा बोजवारा उडाला आहे. सध्या जिल्ह्यात एकूण ७३ प्राथमिक आरोग्य केंदे्र आहेत. त्यांमध्ये १२३ आरोग्याधिकारी कार्यरत आहेत. ४४ पदे रिक्त आहेत. त्यांना रिक्त असलेल्या पदांचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. अतिरिक्त कार्यभार असलेले डॉक्टर रजेवर असल्यास संंबंधित आरोग्य केंद्रातील सेवाच ठप्प होत आहे. लोकसहभागातून आरोग्य केंद्रांचे सुशोभीकरण केले जात आहे. मात्र, डॉक्टरभरतीकडे दुर्लक्ष केले जात आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्याकडून डॉक्टरांच्या रिक्त जागेवर चर्चा होते. मात्र, भरावयाच्या रिक्त जागेसंबंधी आमदार, खासदार यांच्याकडून शासकीय स्तरावर ठोस पाठपुरावा होत नाही. दहा हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांतील प्राथमिक आरोग्य केंद्रांतही डॉक्टर नाहीत.कित्येक आरोग्य केंद्रात केवळ एकच डॉक्टरप्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात मंजूर पदानुसार दोन डॉक्टर असणे आवश्यक आहे. मात्र, अनेक तालुक्यातील कित्येक केंद्रांत एकच डॉक्टर आहे. त्याबाबतची माहिती अशी : वाटंगी, उत्तूर (ता. आजरा); हसूर (करवीर), कसबा सांगाव, चिखली, सिद्धनेर्ली, पिंपळगाव, कापशी (कागल); कानडेवाडी, हलकर्णी, मुुंगूरवाडी, महागाव (गडहिंग्लज); कोतोली, बोरपाडळे, बाजारभोगाव (पन्हाळा); परळे निनाई, करंजफेण, शित्तूर, आंबा, मांजरे, बांबवडे (शाहूवाडी); कानूर, हेरे, अडकूर (चंदगड); अब्दुललाट, नृसिंहवाडी (शिरोळ); कडगाव, पाटगाव, पिंपळगाव, मडिलगे (भुदरगड); राशिवडे, ठिकपुर्ली, धामोड, सरवडे, पथक तुरंबे (राधानगरी); निवडे (गगनबावडा).रिक्त डॉक्टरांची पदे भरण्यासंबंधी वेळोवेळी झालेल्या बैठकांत वरिष्ठांचे लक्ष वेधले आहे. पाठपुरावाही केला जात आहे. शासकीय स्तरावरील हा विषय आहे.- डॉ. आर. एस. आडकेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा परिषद