शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

नरके-हाळवणकर समन्वय समितीचे प्रमुख

By admin | Updated: February 9, 2015 00:36 IST

युतीच्या आमदारांच्या बैठकीत निर्णय : शासकीय कमिट्या नियुक्तीबाबत झाली चर्चा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील युतीच्या आमदारांची पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह येथे बैठक झाली. यामध्ये दोन्ही पक्षांच्या समन्वय समितीचे प्रमुख म्हणून आमदार चंद्रदीप नरके व आमदार सुरेश हाळवणकर यांची निवड केल्याचे समजते. यामध्ये शासकीय समित्यांसह इतर नियुक्त्यांमध्ये मित्रपक्षांना किती वाटा द्यायचा याविषयीही चर्चा झाल्याचे समजते. जिल्ह्णातील शिवसेना, भाजपसह मित्रपक्षांमध्ये समन्वय राहावा, यासाठी पालकमंत्री पाटील यांनी युतीच्या आमदारांच्या बैठकीचे आयोजन केले होते. शिवसेना, भाजप, रिपाइं, स्वाभिमानी शेतकरी संघटना या पक्षांमध्ये समन्वयाने काम करण्याचा निर्णय बैठकीच्या सुरुवातीला घेण्यात आला. जिल्हा नियोजन मंडळाचा निधी वाटप असो अथवा शासकीय समित्या; यामध्ये सर्व मित्रपक्षांना सामावून घेऊन कामकाज करण्याचा निर्णय घेण्यात आला. मित्रपक्षांमध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारी आमदार चंद्रदीप नरके व आमदार सुरेश हाळवणकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. बैठकीत जिल्हा नियोजन मंडळाकडून वाटप करण्यात येणाऱ्या निधीबाबतही चर्चा झाली. मार्चअखेर जवळ आल्याने नियोजन मंडळाच्या निधीतील कामे लवकरच सुचविण्यास मंत्री पाटील यांनी आमदारांना सांगितले. शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी एक कोटीचा निधी पोलीस खात्याकडे देण्यात आला आहे. तो महापालिकेच्या माध्यमातून द्यावा, असा काहींचा प्रयत्न होता, असे मंत्री पाटील यांनी या बैठकीत सांगितल्याचे समजते. संजय गांधी निराधार योजना समिती, विशेष कार्यकारी अधिकारी यांसह इतर शासकीय कमिट्यांवर कार्यकर्त्यांना संधी देण्याबाबत लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी बहुतांश आमदारांनी केली. तातडीने कमिट्यांच्या नियुक्त्या केल्या जाणार, अशी ग्वाही पालकमंत्री पाटील यांनी दिल्याचे समजते. बैठकीला आमदार सुरेश हाळवणकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, आमदार उल्हास पाटील उपस्थित होते.