शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

‘मागेल त्याला नव्हे मिळेल त्यालाच शेततळे’

By admin | Updated: March 7, 2016 01:01 IST

जाचक अटींमुळे शेतकरी वंचितच : ४०७ चे उद्दिष्ट प्रस्ताव केवळ चारच

राजाराम लोंढे - कोल्हापूरसरकारने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘मागेल त्या शेतकऱ्यांना शेततळे’ देण्याची घोषणा केली खरी पण त्याच्या जाचक अटींमुळे ‘मिळेल त्यालाच शेततळे’, असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शिरोळ तालुक्यातील केवळ सात गावांचा समावेश यामध्ये झाला असला तरी तेथील शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ होत नाही. ४०७ शेततळ्यांचे उद्दिष्ट असले तरी आतापर्यंत केवळ चारच प्रस्ताव आॅनलाईन कृषी अधीक्षक कार्यालयाकडे प्राप्त झाले आहेत. पाणी साठवण्याबाबत विविध योजनांच्या माध्यमातून राज्य व केंद्र सरकार आग्रही आहे. सरकारच्या ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना सरकारने आणली आहे; पण या योजनेतील अटी व शर्ती पाहिल्या तर ही योजना इतर योजनांप्रमाणेच फसवी असल्याचा आरोप होत आहे. मागील ५ वर्षांत ५० टक्क्यांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावांचा समावेश या योजनेत होतो. कोेल्हापूर जिल्ह्णात यावर्षीच पाऊस कमी झाल्याने केवळ शिरोळ तालुक्यातील सात गावांचा समावेश या योजनेत झाला आहे. आत्महत्या झालेले कुटुंब, दारिद्र्यरेषेखालील शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी प्राधान्य देण्याच्या सूचना आहेत. सरकार संबंधित शेतकऱ्याला ५० हजार रुपये देणार आहे पण मार्केटमधील खुदाईचा दर पाहिला तर ३० ते ४० रुपये घन प्रतिमीटर आहे. सर्वसाधारणपणे २३०० घनमीटर शेततळ्याची खुदाई केली जाणार आहे, त्यासाठी सुमारे ऐंशी हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. जाचक अटी व अपुरे अनुदान यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाही, आतापर्यंत केवळ चारच प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. दीड एकरवालादारिद्र्यरेषेखाली कसा?या योजनेसाठी कमीत कमी दीड एकर क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांनाच लाभ घेता येणार आहे. त्यात तो दारिद्र्यरेषेखालील असेल तर त्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या दारिद्र्यरेषेखाली नाव येण्यासाठी जे निकष आहेत, त्यामध्ये दीड एकरवाला कसा बसू शकतो, असा सवाल करत पाणी अडवण्याचेच उद्दिष्ट असेल तर अटींमध्ये शिथिलता द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.या गावांचा झाला समावेश -तमदलगे, निमशिरगांव, हरोली, कोंडिग्रे, जैनापूर, धरणगुत्ती, चिपरी.‘सोशल मीडियावरून खिल्ली!या योजनेच्या जाचक अटींमुळे लाभार्थी वंचित राहत आहेत. पहिल्यांदा मोफत जेवण असल्याचे सांगून भरपूर जेवायला सांगायचे? ताटात भात घातल्यानंतर आमटीसाठी ताटकळत ठेवायचे, असाच प्रकार या योजनेची असल्याची टीकाही सोशल मीडियावर रंगू लागली आहे.