शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

त्याने चक्क आडवली ऑक्सिजनवाहक बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:24 IST

कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग वाढताना तोंडावरील मास्क काढण्याचे आवाहन करत नागरिकांची दिशाभूल करणारा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला. या ...

कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग वाढताना तोंडावरील मास्क काढण्याचे आवाहन करत नागरिकांची दिशाभूल करणारा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला. या दरम्यान त्या माथेफिरूने चक्क ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या केएमटी बसला अटकाव केला. कर्मचाऱ्यांना मास्क काढायला लावला. असे कृत्य करणाऱ्या आणि त्याचे चित्रीकरण करून सोशल मीडियावर टाकणाऱ्या सुहास गणेश पाटील (वय ३०, रा. क्रांतिसिंह नाना पाटील नगर, रिंगरोड) याला मंगळवारी जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली.

कोल्हापूर शहरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. वाढता मृत्यू दरही चिंताजनक आहे. त्यासाठी शहरातील दवाखाने आणि कोविड सेंटरसाठी ऑक्सिजनची वाढती गरज ओळखून कोल्हापूर महापालिकेने ऑक्सिजन पुरवठा करणारी बस तैनात केली. चार कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली ही बस २४ तास कार्यरत ठेवली आहे. शनिवारी दुपारी सानेगुरुजी वसाहतीकडून क्रशर चौकाकडे ही बस येत होती. चौकानजीक रस्त्यात खोदकाम केल्याने ही बस वनवे मार्गावरून जाताना सुहास पाटील या माथेफिरूने आपली दुचाकी आडवी मारून बस रोखली. ती पुन्हा मागे घेण्यास भाग पाडली. वन वे तून पुन्हा यायचे नाही अशी मग्रुरीची भाषा वापरली, तसेच त्या बसवरील विनंती करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही रोखले. त्या कर्मचाऱ्यांच्या तोंडावरील मास्क आपल्या हाताने बळजबरीने काढण्याचा प्रयत्न केला.

‘खाक्या’ दाखवताच भूमिका बदलली

तत्पूर्वी, सुहास पाटील याने रस्त्याकडेला बसलेल्या एका महिलेलाही कोरोना अस्तित्वात नसल्याचे सांगून त्यांचा मास्क काढण्यास भाग पाडले. चुकीचा संदेश पसरवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून दिशाभूल केल्याप्रकरणी त्याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला, तर मंगळवारी दुपारी त्याला जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. दरम्यान, त्याला पोलिसांनी ‘खाक्या’ दाखवताच त्याने आपली भूमिका बदलत मास्क तोंडावर घालण्याचे आवाहन केले.