शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

पाठीमागून आले अन् गोळीबार केला

By admin | Updated: March 16, 2015 00:45 IST

उमा पानसरे : हल्लेखोरांबाबत पोलिसांनी घटनास्थळावरून घेतली माहिती

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनास्थळाची पाहणी या प्रकरणातील एकमेव साक्षीदार उमा पानसरे व तपास अधिकारी अंकित गोयल यांनी रविवारी सकाळी केली. यावेळी गोयल यांनी ‘आई, तुम्हाला काही आठवतंय का?’ अशी विचारणा केली. त्यावर त्यांनी हल्लेखोर पाठीमागून आले आणि साहेबांवर गोळीबार केला. त्यानंतर आपण बेशुद्ध पडल्याने पुढचे काही आठवत नसल्याचे सांगितले. गोयल यांनी सुमारे अर्धा तास त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. १६ फेब्रुवारी रोजी पानसरे दाम्पत्यावर गोळीबार झाला. त्यामध्ये गंभीर जखमी झालेले अ‍ॅड. गोविंद पानसरे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणातील प्रत्यक्ष साक्षीदार त्यांच्या पत्नी उमा या रुग्णालयातून उपचार घेऊन घरी परतल्या आहेत. त्यांच्या जबाबावर तपासाची दिशा ठरणार असल्याने तो घेण्यासाठी पोलीस कसोशीने प्रयत्न करीत होते. दरम्यान, शनिवारी त्या थेट वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींशी बोलल्याने पोलीस प्रशासनाची धांदल उडाली. अप्पर पोलीस अधीक्षक गोयल यांनी शनिवारी रात्री आठच्या सुमारास त्यांची घरी भेट घेतली. मारेकऱ्यांची रेखाचित्रे दाखविली असता त्यांनी त्यावर कोणतेच उत्तर दिले नाही. ापण हास्यक्लबमधून जाऊन आल्यानंतर हल्ला झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सुमारे दीड तास ते त्यांच्याकडून माहिती घेत होते. त्यानंतर रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास पुन्हा गोयल यांनी त्यांची भेट घेतली. त्यांच्या घरापासून काही अंतरावरच हल्ला झाला, ते घटनास्थळ उमा पानसरे यांना दाखविण्यात आले. यावेळी त्यांना व्हीलचेअरवरून घटनास्थळी आणण्यात आले. त्यांच्यासोबत त्यांचे जावई बन्सी सातपुते, मुलगी स्मिता, सून मेघा, नातू कबीर व मल्हार, दिलीप पवार व मिलिंद यादव होते. यावेळी गोयल यांनी त्यांच्याकडून हल्ल्याची माहिती घेतली.मोटारसायकलीबाबत विसंगत माहिती पोलिसांनी स्प्लेंडर व पल्सर अशा दोन मोटारसायकली जप्त केल्या आहेत. उमा पानसरे यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये दोघे मारेकरी बुलेटवरून आल्याचे सांगितल्याने पोलीस चक्रावले आहेत. रविवारी सकाळी जप्त केलेल्या स्प्लेंडर व पल्सर या दोन मोटारसायकली उमा पानसरे यांना दाखविल्या. यावेळी त्यांनी मोटारसायकल नेमकी कोणती होती, हे आठवत नसल्याचे सांगितले.उमा पानसरे यांची भेट घेऊन त्यांना घटनास्थळ दाखविले असता त्यांनी हल्ला कसा झाला, याची थोडीफार माहिती दिली. अद्याप पूर्ण माहिती मिळालेली नाही. आठवेल तशी त्या आम्हाला माहिती देत आहेत. टप्प्याटप्प्याने त्यांच्याकडून याप्रकरणी संपूर्ण माहिती घेतली जाईल.- अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षककोल्हापुरात ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या साक्षीदार त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी रविवारी घटनास्थळाची पाहणी केली.