शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सेवेच्या भावनेतूनच त्यांनी घेतले अंध अमोलला दत्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 05:43 IST

मानकर कुटुंबीयांचे मोठेपण : खासगी ड्रायव्हरच्या मनाची श्रीमंती

- विश्र्वास पाटीललोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : चांगले काम करण्यासाठी तुमच्या खिशात पैसेच असायला हवेत असे काही नाही. मुंबईतील  एका खासगी गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या व कसेबसे दरमहा १५ हजार रुपये पगार मिळणाऱ्या अशोक शंकर मानकर यांनी फक्त सेवेच्या भावनेतून आजन्म अंध असलेल्या अमोलला दत्तक घेतले आहे. अमोलचे आईवडील बनून मानकर दाम्पत्याने मनाची श्रीमंती दाखवून दिली आहे. मानकर यांच्या शिक्षिका असलेल्या दोन्ही मुली ब्रह्माकुमारी परिवारामध्ये वसईला सेवेत लीन झाल्या आहेत. त्यांचा मुलगा अभिषेक हा जिम प्रशिक्षक आहे.

अमोल मूळचा कोकणातील. आईला एक डोळा नाही व मुलगाही पूर्ण अंधच जन्माला आल्यावर कुटुंबाने त्यांना घराबाहेर काढले. त्यामुळे तो डॉ. प्रमिला जरग यांच्या मुंबईतील शिशुआधार केंद्रात आला. जरग यांनी मुंबईतील सर्व रुग्णालयांत त्याच्या डोळ्यांवर उपचार केले. डॉ. तात्याराव लहाने यांनीही त्याची तपासणी केली; परंतु मेंदूकडून डोळ्याकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्याच नसल्याने व बुबुळ नसल्याने त्याचे अंधत्व दूर करता आले नाही. विशेष मुलांचा अभ्यास करण्यासाठी म्हणून मानकर यांच्या दोन्ही मुली जरग यांच्या संस्थेत येत होत्या. त्यांना अमोलचा लळा लागला व त्यांनी त्यास दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. त्याचे अंधत्व आयुष्यभर राहणार आहे असे सांगूनही त्यांचा निर्धार तसूभरही कमी झाला नाही. अमोलचा एक पाय उलटा होता, त्याला चालता येत नव्हते, वाडिया हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. जे डॉक्टर अशा मुलाला कशाला दत्तक घेतले म्हणत होते, त्यांनी शस्त्रक्रियेचा एक रुपयाही घेतला नाही. अमोल आता आठ वर्षांचा आहे. तो दुसरीत शिकतो. तो प्रचंड हुशार आहे. दिसायलाही अतिशय सुंदर आहे. कुणीही पाहिले तर त्याला उचलून घ्यायचा मोह आवरत नाही.

सेवावृत्तीला सलामचn मानकर मूळचे नाशिक जिल्ह्यातील; परंतु गेली अनेक वर्षे ते मुंबईत परळला राहतात. त्यांनी अंध अमोलला दत्तक घेतल्याचे समजल्यावर तेथील एका बांधकाम व्यावसायिकाने मानकर यांच्या सेवावृत्तीला सलाम म्हणून तब्बल ७५ लाखांचा फ्लॅट त्यांना भेट दिला आहे. तो भाड्याने देऊन मानकर सध्या विरारला राहतात.